Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उन्हाच्या काहिलीत सुमधुर शीतल दिलासा देणारे ताडगोळे असतात कसे? किती उपयोगी?

September 6, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Ice Apple

अपेक्षा सकपाळ

प्रत्येक फळ हे त्या त्या ऋतूनुसार खावे, असे वडिलधारे सांगतात. आयुर्वेदातही तसंच आहे, असं सांगितलं जातं. कारण त्यांचे त्या ऋतूत अधिक फायदे असतात. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळा म्हटलं की, आंबे डोळ्यासमोर येतातच मात्र या उन्हाळ्यात आणखी एक असं फळ आहे जे चवीला शहाळ्यातील मलईप्रमाणे मधुर आहेच पण आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी आहे.

 

ताडगोळे कसे असतात?

  • ऐकून का होईना आपल्याला नीरा हे सुमधुर पेय, तसंच त्याचाच ताडी हा मद्य प्रकार यामुळे ताडाचं झाड माहित असतंच.
  • ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा.
  • याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे.
  • इंग्रजी भाषेमध्ये ‘आईस अॅपल’ या नावाने ओळखले जाते.
  • हे फळ भारतात महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
  • ताडाच्या झाडांची लागवड समुद्रकिनारी अधिक होते.
  • ताडगोळ्यांना बंगालमध्ये याला ‘ताल’, तेलुगूत ‘ताती मुंजलू’, तमिळमध्ये ‘नुग्नू’तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावानं ओळखलं जातं.

 

काय आहे ताडगोळे?

  • ताडगोळे हे फळ वर्षामध्ये ठराविक ऋतूमध्ये, म्हणजे उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असणारे फळ आहे.
  • पाच सात सेमी व्यासाचे हे छोटेसे फळ.
  • वरती हिरवट – काळपट -मातकट रंगाची साल.
  • ताडगोळे हे अतिशय मऊ आणि रसदार असतात.
  • त्यांच्यावर जाड साल असतं.
  • ही सालं काढणं सोपं नसतं.
  • मात्र एकदा का साल काढली तर आत रसदार पांढरे गरे म्हणजेच ताडगोळे असतात.
  • याची चव काहीशी शहाळ्यातील मलई प्रमाणे लागत असून, चवीला हे फळ मधुर असते.
  • हे एक पाणीदार फळ असल्यामुळं ते कापायची गरज नसते.

 

उन्हाळ्यात ताडगोळे आरोग्यदायी!

  • आरोग्याच्या दृष्टीनं उन्हाळ्यात थंडगार ताडगोळे खाणं उत्तम
  • या फळाची प्रवृत्ती थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्ल्यास फळाचा आरोग्यासाठी फायदाच होतो. ताडगोळ्यांमध्ये
  • खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात.
  • हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं.
  • त्याचबरोबर फळामुळे शरीराचं तापमानही नियंत्रणात राहतं.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येकानं या फळाचं आवर्जून सेवन करावं.
  • उष्णतेमुळं होणारी पोटातली जळजळ कमी होण्यात ताडगोळे मदत करतं.
  • उन्हाळ्याच्या अनेकांना उन्हाळी लागते अशावेळी ताडगोळे खाल्ल्यास आराम मिळतो.
  • ताडगोळे आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो.
  • साल न काढता फ्रीजमध्ये ठेवल्यास ताडगोळे अनेक दिवस टिकतात.
  • बाहेर उन्हात जाण्यापूर्वी हे फळ खावे. त्यामुळे उन्हाचा दाह कमी होतो.

 

ताडगोळ्यांचा त्वचेसाठीही फायदा-

  • उन्हामुळे लहान मुलांना आणि मोठ्यांना अनेकदा त्वचेवर पुरळ येतात, अॅलर्जी होते अशावेशी ताडगोळ्यांचा रस त्वचेवर, पुरळांवर लावल्यास लवकर आराम मिळतो.
  • ताडगोळ्यांपासून फेसपॅकही चांगला बनवता येतो. त्यासाठी चंदन उगाळून घ्यावं.
  • त्यात थोडं नारळपाणी आणि ताडगोळा कुस्करून घालावा.
  • याचा तयार झालेला फेस पॅक आपण चेहऱ्यावर लावावा.
  • या फेसपॅकमुळं आपल्याला फ्रेश वाटेल आणि उन्हामुळं रापलेली त्वचा उजळेल.

 

अनेक व्याधींवर ताडगोळे उपयोगी

  • किडनीच्या आरोग्यासाठी ताडगोळे अतिशय उपयुक्त असून शरीरातील नको असलेली द्रव्ये शरीराबाहेर फेकली जातात.
  • ताडगोळे खाल्ल्यानं बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही.
  • कांजण्या आलेल्या रुग्णांनी ताडगोळे खावेत. त्यामुळं कांजण्यांनी शरीराला येणारी खाज कमी होते.
  • ताडगोळ्यांमुळे शरीरातील साखरेची पातळी संतुलीत राहते.
  • हे खाल्ल्यानं अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते.

 

वाचा:

ताडगोळे…वरून टणक आत सुमधुर शीतल! जाणून घ्या त्यांचा प्रवास…

ताडगोळे…वरून टणक आत सुमधुर शीतल! जाणून घ्या त्यांचा प्रवास…

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: apeksha sakpalGood news MorningIce Applesummerअपेक्षा सकपाळउन्हाच्या काहिलीताडगोळेशीतल दिलासा
Previous Post

ताडगोळे…वरून टणक आत सुमधुर शीतल! जाणून घ्या त्यांचा प्रवास…

Next Post

रिक्षाचालकांची भन्नाट कल्पना, उन्हाळ्यात रिक्षा गारेगार ठेवण्यासाठी छतावर हिरवेगार गवत!

Next Post
green grass on the roof to of rickshaw warm in summer

रिक्षाचालकांची भन्नाट कल्पना, उन्हाळ्यात रिक्षा गारेगार ठेवण्यासाठी छतावर हिरवेगार गवत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!