मुक्तपीठ टीम
हल्ली फेसबुक अकाऊंट हॅक होण्याच्या घटना जास्तच घडत आहेत. फेसबुक अकाऊंट हॅक करत पैसे उकळवण्याचा धंदा सर्रास घडत आहेत. आज आम्ही तुम्हाला याबाद्दल सतर्क करणार आहोत. जर तुमचे फेसबुक अकाऊंट वारंवार हॅक होत असेल, वैयक्तिक डेटा लीक होण्यापासून वाचवायचा असेल तर या टिप्स फॉलो करा.
काहीवेळा हॅकर आपल्या नकळत आपले फेसबुक अकाऊंट हॅक करतात आणि आपल्याला ते माहितही नसतं. कारण आपण आपल्या फेसबुक अकाऊंटच्या सुरक्षेकडे फारसे लक्ष देत नाही.जर एखादा हॅकर तुमच्या फेसबुक प्रोफाईलला एक्सेस करतो, तेव्हा आपली बरीच वैयक्तिक माहिती लीक करु शकतो. किंवा फेसबूक अकाऊंटवरून काही चुकीच्या पोस्ट करू शकतो. तसेच अनेकदा फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून पैसे मागून फसवणुकीच्याही घटना घडतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि अकाऊंट सुरक्षित ठेवा.
फेसबुक अकाऊंटला हॅक होण्यापासून कसे वाचवावे?
#1. Enable Loging Alert:
हे फेसबुकचे जबरदस्त फिचर आहे. हे फिचर तुम्हाला एनेबल करावे लागेल.
लॉगिन अलर्टला एनेबल केल्यानंतर जेव्हा तुम्ही फेसबुक अकाऊंट लॉगिन कराल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.
Unusable login attempt notification याचा अर्थ नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणाहून, वेगळ्या पद्धतीनं कुणीतरी तुमचं अकाऊंट उघडू पाहत आहे. ती मिळाल्यानंतर, तुम्ही तुमचे फेसबुक अकाऊंट हॅक होण्यापासून रोखू शकाल आणि तुम्ही तुमची गुप्त माहिती लीक होण्यापासून रोखू शकाल.
Loging Alert सुरु करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा
1. सर्वप्रथम तुमच्या फेसबुक अकाऊंटला लॉग इन करा.
2. आता setting>security & login करा
3. आता खाली setting up extra security मध्ये जाऊन login alert एनेबल करा.
#2 फोन नंबर आणि वैयक्तिक माहिती लपवा:
तुमचे फेसबुक अकाऊंट हॅक होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या फेसबुक अकाऊंटवरील तुमचा फोन नंबर किंवा ईमेल पत्ता नक्कीच हाइड करा.
आपला फोन नंबर आणि मूलभूत माहिती लपवण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा
1. सर्वप्रथम तुमच्या फेसबुक अकाऊंटमध्ये लॉग इन करा.
2. आता तुमच्या प्रोफाइल वर जा आणि About वर क्लिक करा.
3. contact आणि basic info वर जा.
4. मोबाईल नंबर आणि ईमेल अॅड्रेसला only me करा.
#3 Setup Two- Factor Authentication:
जर तुम्हाला तुमचे फेसबुक अकाऊंट अधिक सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही फेसबुकचे हे फिचर वापरणे आवश्यक आहे. हे एनेबल केल्याने, कोणीही आपल्या फेसबुक खात्यात सहज प्रवेश करू शकणार नाही. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन एनेबल केल्यानंतर, जेव्हाही तुम्ही किंवा इतर कोणीही तुमचे फेसबुक अकाऊंट लॉग इन करते, तेव्हा तुमच्या फोन नंबरवर एक Otp येईल.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनेबल केल्यानंतर, जरी एखाद्याला तुमच्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड मिळाला, तरीही तो तुमचे फेसबुक अकाऊंटवर लॉग इन करू शकणार नाही.
Setup Two- Factor Authentication ऑपशन चालू करण्यासाठी, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
1. सर्वप्रथम तुमचे फेसबुक अकाऊंट लॉगिन करा.
2. आता setting>security & login वर जा.
3. नंतर Setup two-factor authentication वर क्लिक करा.
4. आता तुम्ही कोणत्याही two step verification निवडून सेटअप करू शकता.
# 4 trusted feature:
जर तुम्हाला तुमचे फेसबुक अकाऊंट सुरक्षित ठेवायचे असेल, तर trusted feature नक्की वापरा, जर तुमचे अकाऊंट हॅक झाले असेल, तर trusted feature याच्या मदतीने तुम्ही तुमचे अकाऊंट सहज परत मिळवू शकता.
trusted feature सेट करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
1. सर्वप्रथम तुमच्या फेसबुक अकाऊंट लॉगिन करा.
2. आता setting>security & login वर जा.
3. आता setting up extra security वर क्लिक करा.
4. आता तुम्ही तुमचे ३ ते ५ मित्र जोडू शकता.
#5. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका:
जर तुम्हाला तुमचे फेसबुक अकाऊंट हॅक होण्यापासून वाचवायचे असेल, तर कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. तुमच्या फेसबुक अकाऊंटवर लॉग इन करण्यापूर्वी नेहमी ती URL तपासा की ती https://www.facebook.com आहे. फिशिंग पेज तयार करून हॅकर्स तुमचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करतात, कोणाचेही फेसबुक अकाउंट हॅक करण्यासाठी ही पद्धत सर्वात जास्त वापरली जाते.
नाशिकमधील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, केली पैशाची मागणी