Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉन १५ जानेवारी २०२३ला! अशी करा नोंदणी…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Tata Mumbai Marathon 2023

मुक्तपीठ टीम

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवाशाली परंपरा आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली ही स्पर्धा १५ जानेवारी २०२३ मध्ये होणार असून या स्पर्धेसाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या नोदणीसाठीच्या खास पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.

Tata Mumbai Marathon 2023

हॉटेल ट्रायडंट येथे टाटा मुंबई मॅरेथॉन नोंदणी शुभारंभाची घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, टाटा सन्सचे ब्रँड संरक्षक हरीश भट, टाटा सन्सचे उपाध्यक्ष उज्ज्वल माथूर, आयडीएफसी बँकेचे मुख्य कार्यअधिकारी बी. माधवन, एफआय चे अध्यक्ष अदीले सुमरीवाला, वेस्टर्न नेव्हल कमांडट कृष्ण स्वामिनाथन, बीसीसीएलचे अध्यक्ष शिवकुमार सुंदरम, टाटा मोटर्सचे मार्केटींग हेड विवेक श्रीवास्तव यांसह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा होत्या. तथापि, सध्या जनजीवन पूर्वपदावर आल्याने मोठ्या कालावधीनंतर, सर्व स्पर्धकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मॅरेथॉन  २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटू आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना आता या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत ५० हजारांहून अधिक हौशी तसेच व्यावसायिक धावपटू जगभरातून सहभागी होतील, ही स्पर्धा अधिक आकर्षक होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वांना एकाच मंचावर आणण्याठी मॅरेथॉन हे एक उत्तम माध्यम आहे. सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रीटी, लोकप्रतिनिधी देखील या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवतील, अशी आशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

Tata Mumbai Marathon 2023

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर, टाटा सन्सचे ब्रँड संरक्षक हरीश भट, टाटा सन्सचे उपाध्यक्ष उज्ज्वल माथूर, आयडीएफसी बँकेचे मुख्य कार्यअधिकारी बी. माधवन आदींनी मनोगत व्यक्त केले तसेच अधिकाधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी tatamumbaimarathon.procam.in या अधिकृत वेब पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन टाटा सन्सचे ब्रँड संरक्षक हरीश भट यांनी केले.


Tags: Good news MorningNews 2 Usetata consultancyTata Mumbai Marathonउपयोगी बातमीगुड न्यूज मॉर्निंगटाटा मुंबई मॅरेथॉन
Previous Post

टपाल खात्याने कामाठीपुऱ्यात शरीरविक्रय करणाऱ्यांसोबत साजरा केला रक्षाबंधन सण, तिरंगा झेंड्यांचंही वाटप!

Next Post

विविध प्रकल्पांसाठी ‘महाप्रित’ चा नागपूर महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार

Next Post
MAHAPREIT

विविध प्रकल्पांसाठी 'महाप्रित' चा नागपूर महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!