मुक्तपीठ टीम
उठता बसता फोन हॅक झाल्याचे ऐकायला येते. तशा बातम्या कानावर येतात. त्यामुळे अनेकजण आपल्या फोनच्या सेटिंग्जवरून चिंतेत असते. पण कधीकधी एखादा अॅप इनस्टॉल करताना बर्याच अॅप्सना अप्रमाणित परमिशन देता, ज्यामुळे फोन हॅक केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्सविषयी सांगणार आहोत.
गूगल प्ले स्टोरवरून अॅप डाउनलोड होणाऱ्या मोबाईल अप यूजर्सच्या फायद्यासाठी अनेक परमिशन इन्स्टॉल होण्यापूर्वी येत असतात. यानंतर, काही अॅप्स चांगल्या प्रकारे कार्य करतात, तर काही यूजरच्या लोकेशन तसेच अनवधानानं दिलेल्या इतर अनेक परवानग्यांचा वापर करतात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या फोनच्या सेटिंग्जवर जाऊन अॅप्सची परमिशन तपासू शकता, ज्यामुळे आपली प्रायव्हसी टिकून राहील. ऑनलाइन फसवणूक होणार नाही आणि स्मार्टफोनची बॅटरी लाईफ देखील वाढवेल.
अॅप्सना दिलेली नको ती परवानगी कशी हटवाल?
- अँड्रॉई़ड फोन यूजर्सनी प्रथम फोनच्या सेटिंग्जवर जावे.
- त्यानंतर अॅप्लिकेशन / अॅप / अॅप आणि नोटीफिकेशनवर जा.
- हा पर्याय बर्याच फोनमध्ये वेगळा असू शकतो.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, स्क्रीनवर अॅप्सचे पर्याय दिसतील. एसएमएस पर्याय उघडा आणि कोणकोणते अॅप्स मॅसेज वाचतात ते पाहता येते.
- या सूचीमध्ये कोणतेही अनावश्यक अॅप्स आढळल्यास ते तेथून काढले जाऊ शकतात.
- त्यानंतर ते आपले संदेश वाचू शकणार नाहीत.
- त्याच प्रकारे लोकेशन, कॅमेरा, स्टोरेज, फोन संपर्क इ. विभागात जाऊन त्यांची परमिशन तपासू शकता.