मुक्तपीठ टीम
भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) जारी केलेला १२-अंकी ओळख क्रमांक, हा भारतीयांसाठी त्यांची ओळख सांगणारा महत्वाचा पुरावा आहे. यूआयडीएआयने आधारकार्ड बनवण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. लहान मुलांकडेही आधारकार्ड असू शकतं जे त्यांना आजन्म उपयुक्त ठरतं. लहानग्यांच्या आधारकार्डसाठी मुलाच्या जन्माच्या दाखल्यासह, पालकांपैकी एकाचं आधार कार्ड आवश्यक आहे.
५ वर्षांखालील मुलांचा बायोमेट्रिक डेटा घेतला जात नाही. मुलाच्या यूआयडीवर डेमोग्राफिक तपशील आणि पालकांच्या आधार कार्डशी जोडलेल्या छायाचित्रांसह प्रक्रिया केली जाते. जेव्हा मूल ५ वर्ष आणि १५ वर्षांचं होतं तेव्हा हाताच्या १० बोटांचे ठसे घेतले जातात.
लहान मुलांचं आधारकार्ड बनवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे :
१. यूआयडीएआय वेबसाइट किंवा ‘आधार’ हेल्पलाइन नंबर १४७ वर कॉल करून जवळचं आधार सेवा केंद्र शोधा.
२. तुम्ही आधार सेवा केंद्र ऑनलाईनही शोधू शकता.
३. आधार सेवा केंद्रावर पोहोचल्यानंतर मुलासाठी आधार नोंदणी फॉर्म भरा. पालकांपैकी एकाचा आधार क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
४. या फॉर्ममध्ये आई किंवा वडीलांच्या आधारकार्डआधारे पत्ता आणि इतर तपशील भरा.
५. मुलाचं जन्म प्रमाणपत्रही सादर करा.
६. त्यानंतर मुलाचा फोटो घेतला जाईल आणि आधार सेवा केंद्रात हजर असलेली कार्यकारी व्यक्ती तुम्हाला नावनोंदणीची स्लिप देईल. या स्लिपमध्ये नावनोंदणी क्रमांक असेल.
७. आपण नोंदणी क्रमांकाद्वारे आपल्या आधारची स्थिती तपासू शकता. इतकंच नव्हे तर आधारकार्ड तयार झाल्यानंतर आपण त्याची पीडीएफ प्रत यूआयडीएआय वेबसाइटवरूनदेखील डाऊनलोड करु शकता.