Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मधुमेहाची लक्षणं कशी ओळखावी? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

September 5, 2026
in आरोग्य
0
diabetes

मुक्तपीठ टीम

मधुमेह! सगळ्यांनाच हा आजार नकोसा वाटतो. त्यासाठी नियमित व्यायाम कारणे, जंक फूड न खाणे, भाज्या खाणे, फळांचा रस पिणे इत्यादी गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वस्थ राहण्यासाठी ते आवश्यकही आहे. आजकाल मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. मधुमेहामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. काही लोक शरीरात होत असलेल्या बदलांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे ही समस्या नंतर आरोग्य समस्यांचे कारण बनू शकते.

मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखावी?

१. वारंवार लघवी येणे

  • मधुमेहामुळे रक्तातील अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी किडनीला जास्त मेहनत करावी लागते.
  • अशा स्थितीत जेव्हा साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा किडनी हे लघवीतूम काढून टाकते, त्यामुळे लघवी वारंवार येते.
  • जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आणि विशेषत: रात्री बाथरूममध्ये जावे लागत असेल तर ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचे लक्षण आहे.

२. युरिन इन्फेक्शन होणे

  • साखरेमुळे युरिन इन्फेक्शन वारंवार होते.
  • लघवीतील अतिरिक्त साखर यीस्ट आणि बॅक्टेरियासाठी अन्न म्हणून काम करते. तसेच उबदार आणि ओलसर क्षेत्र त्यांना वाढण्यास मदत करते.
  • विशेषत: ज्या महिलांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना याचा अधिक अनुभव येऊ शकतो.

३. जास्त तहान लागणे

  • जेव्हा साखरेचा त्रास होतो तेव्हा वारंवार लघवीला जाण्याने डिहायड्रेशन होते.
  • अशा स्थितीत वारंवार तहान लागते, पण तरीही जास्त पाणी प्यायल्याने तहान भागत नाही. हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे.

४. सतत भूक

  • शरीरात सेवन केलेले अन्न ग्लुकोजमध्ये बदलते. ज्याचा वापर पेशी ऊर्जेसाठी करतात, परंतु मधुमेह असल्यास पेशी योग्यरित्या ग्लुकोज शोषू शकणार नाहीत.
  • त्यामुळे शरीराला मिळणाऱ्या अन्नातून पुरेशी ऊर्जा मिळत नाही. अशा स्थितीत पोट भरले असले तरी काही वेळाने भूक लागेल.

५. शरीरात मुंग्या येणे किंवा सुन्न होणे

मधुमेहामध्ये मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे हात आणि पायांना मुंग्या येतात, सुन्न होणे किंवा वेदना जाणवते.

६. त्वचेवर गडद डाग

  • मधुमेहामुळे रक्तातील इन्सुलिनच्या अतिरेकीमुळे मानेच्या, बगलांच्या किंवा मांडीच्या पटीत त्वचेवर गडद, ​​डाग येतात.
  • या लक्षणांची लवकर काळजी घेतल्यास टाइप २ मधुमेहाचा सामना करता येतो. ही लक्षणे जाणवताच डॉक्टरांना भेट देणे आवश्यक आहे.

Tags: diabetesdiabetes diseasediabetes symptomshealthmuktpeethworld diabetes dayआरोग्यजागतिक मधुमेह दिनमधुमेहमधुमेह आजारमधुमेह लक्षणमुक्तपीठ
Previous Post

पेरूचे आरोग्यासाठी असणारे लाभदायक फायदे!

Next Post

भव्य प्रिमिअर शोद्वारे वाजत गाजत ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपटगृहात!

Next Post
Varhadi Vajamtri

भव्य प्रिमिअर शोद्वारे वाजत गाजत ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपटगृहात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!