मुक्तपीठ टीम
आता मोठ्या टीव्हीपेक्षा मोबाइलवरच टीव्ही चॅनल्स किंवा चित्रपट, वेब सिरीज पाहण्यावर भर दिसतो. तरीही काही वेळा थोड्या मोठ्या स्क्रिनवर तब्बल ८२२ लोकल ग्लोबल सर्वच चॅनल्सची मजा लुटायची असेल तर तीही सोय आहे. तीही अगदी मोफत. आता जियो टीव्ही अॅपमुळे तुम्हाला लॅपटॉप किंवा पीसीवर ती सर्व चॅनल्स पाहता येतात.
केवळ लाइव्ह कार्यक्रमच नाही तर आपण एक आठवडा जुना शो देखील पाहू शकतो. हे सारं कसं करायचं ते जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.
१. अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे
आपल्याला मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर किंवा अॅंड्रॉइड टीव्हीवर जियोटीव्ही अॅप सापडणार नाही. स्मार्ट टीव्हीमध्ये पाहण्यासाठी, आपल्याला जियोटीव्ही चे एपीके डाउनलोड करावे लागेल आणि नंतर पेन ड्राइव्हसह आपल्या अॅंड्रॉइड टीव्हीवर कॉपी करून इन्स्टॉल करावे लागेल. याचा युजर इंटरफेस थोडा विचित्र वाटू शकेल, कारण हा अॅप टीव्हीसाठी तयार केलेला नाही. अशा परिस्थितीत आपण जियोटीव्ही मोठ्या स्क्रीनवर पाहू इच्छित असाल तर यासाठी लॅपटॉप हा एक चांगला पर्याय असेल. लॅपटॉपवर जियोटीव्ही अॅप वापरण्यासाठी, गुगल प्ले स्टोअर वर जा आणि ब्लूस्टॅक्स अँड्रॉइड एम्युलेटर डाउनलोड करा.
2. जियोटीव्ही अॅप करा इन्स्टॉल
आता ब्लूस्टॅक्स अँड्रॉइड एम्युलेटरमध्ये जियोटीव्ही अॅप शोधा आणि इन्स्टॉस करा. यानंतर जियोटीव्ही अॅप ब्लूस्टॅक्स होम स्क्रीनवर दिसेल. तिथून उघडा. जियोटीव्ही अॅप आता स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉपवर वापरता येईल. स्मार्टफोन आणि टॅब्लेट सारख्या लॅपटॉप / पीसी वर जियोटीव्ही अॅपवर व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा कोणताही पर्याय नाही.