Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त टीडीएस कापला? काळजी करू नका! असा परत मिळवा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
income tax return

मुक्तपीठ टीम

आयकर रिटर्न भरला नसेल तर ही एक महत्त्वाची आणि उपयोगी बातमी आहे. जर २०२२-२३ वर्षात आयकर रिटर्न भरला नसेल तर, आता ही योग्य वेळ आली आहे. शेवटची तारीख संपण्यापूर्वी तुम्ही तुमचे आयकर रिटर्न भरू शकता. यामुळे, अनावश्यक त्रास टळेल आणि दंडाच्या स्वरूपात अतिरिक्त शुल्कही भरावे लागणार नाही. यासाठी ३१ जुलै २०२२ पूर्वी आयकर रिटर्न भरावे लागेल. तसेच जर तुमच्या करप्राप्त उत्पन्नापेक्षा कापला गेलेला टीडीएस जास्त असेल तर काळजी करू नका, तुम्हाला अतिरिक्त रक्कम परत मिळवता येवू शकते.

जर आयकर रिटर्न भरण्याचा विचार करत असाल तर,सर्व कागदपत्रं असणे आवश्यक आहे. जर ई-फायलिंग पोर्टलवर आयटी रिटर्न भरण्याचा विचार करत असाल, तर यासाठी किमान पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म १६, बँक खात्याचे तपशील असणे आवश्यक आहे. याशिवाय, आयटी रिटर्न भरण्यासाठी पॅन आणि आधार नंबर लिंक करणे देखील आवश्यक आहे.

करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त टीडीएस कापला तर ही काळजी घ्या

  • जर काही कारणास्तव तुमच्या करपात्र पगारापेक्षा जास्त टीडीएस कापला गेला असेल, तर काळजी करण्यासारखे काही नाही. अतिरिक्त ठेव रक्कम काढू शकता.
  • आयकर रिटर्न भरून तुम्ही तुमचा कापलेला पगार पुन्हा मिळवू शकता.
  • अशा परिस्थितीत, आयकर विभाग प्रथम तुमचा पगार आणि त्यावर कापलेला एकूण कर तपासेल, जर त्यात काही जुळत नसेल तर आयकर विभाग तुमचा कापलेला पगार परत करेल.

अशा प्रकारे कापलेला टीडीएस परत मिळवता येणार

  • जर पगारातून टीडीएस जास्त कापला गेला असेल तर तो दोन प्रकारे काढता येईल.
  • प्रथम, आयटी रिटर्नमध्ये याचा उल्लेख करावा. यानंतर आयटी विभाग स्वत: त्याची दखल घेईल. दुसऱ्या पद्धतीनुसार, टीडीएस काढण्यासाठी फॉर्म १५जी भरावा लागेल.
  • फॉर्म १५ जी भरा आणि बँकेत सबमिट करा. अशा प्रकारे तुमचा कापलेला टीडीएस अकाउंटमध्ये परत येईल.

आयकर रिटर्नची स्थिती कशी तपासायची

  • आयकर रिटर्नची स्थिती तपासण्यासाठी, सर्वप्रथम, विभागाच्या नवीन अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in वर क्लिक करा.
  • त्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.
  • जे पेज ओपन होईल त्यात ई-फायलिंगचा पर्याय दिसेल, त्यात आयकर रिटर्न निवडा.
  • यानंतर View File Returns वर क्लिक करा. नवीनतम आयटीआर तपशील कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतील.

 


Tags: good newsincome tax returnmuktpeethtaxable incomeTDSआयकर रिटर्नकरपात्र उत्पन्नघडलं-बिघडलंचांगली बातमीटीडीएसमुक्तपीठ
Previous Post

गौतम अदानींची उदारता! ६०व्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी ६० हजार कोटी!

Next Post

एनएचएआयमध्ये ‘टेक्निकल डेप्युटी मॅनेजर’ पदाच्या ५० जागांवर करिअर संधी

Next Post
nhai

एनएचएआयमध्ये 'टेक्निकल डेप्युटी मॅनेजर' पदाच्या ५० जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!