मुक्तपीठ टीम
आयकर रिटर्न भरला नसेल तर ही एक महत्त्वाची आणि उपयोगी बातमी आहे. जर २०२२-२३ वर्षात आयकर रिटर्न भरला नसेल तर, आता ही योग्य वेळ आली आहे. शेवटची तारीख संपण्यापूर्वी तुम्ही तुमचे आयकर रिटर्न भरू शकता. यामुळे, अनावश्यक त्रास टळेल आणि दंडाच्या स्वरूपात अतिरिक्त शुल्कही भरावे लागणार नाही. यासाठी ३१ जुलै २०२२ पूर्वी आयकर रिटर्न भरावे लागेल. तसेच जर तुमच्या करप्राप्त उत्पन्नापेक्षा कापला गेलेला टीडीएस जास्त असेल तर काळजी करू नका, तुम्हाला अतिरिक्त रक्कम परत मिळवता येवू शकते.
जर आयकर रिटर्न भरण्याचा विचार करत असाल तर,सर्व कागदपत्रं असणे आवश्यक आहे. जर ई-फायलिंग पोर्टलवर आयटी रिटर्न भरण्याचा विचार करत असाल, तर यासाठी किमान पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म १६, बँक खात्याचे तपशील असणे आवश्यक आहे. याशिवाय, आयटी रिटर्न भरण्यासाठी पॅन आणि आधार नंबर लिंक करणे देखील आवश्यक आहे.
करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त टीडीएस कापला तर ही काळजी घ्या
- जर काही कारणास्तव तुमच्या करपात्र पगारापेक्षा जास्त टीडीएस कापला गेला असेल, तर काळजी करण्यासारखे काही नाही. अतिरिक्त ठेव रक्कम काढू शकता.
- आयकर रिटर्न भरून तुम्ही तुमचा कापलेला पगार पुन्हा मिळवू शकता.
- अशा परिस्थितीत, आयकर विभाग प्रथम तुमचा पगार आणि त्यावर कापलेला एकूण कर तपासेल, जर त्यात काही जुळत नसेल तर आयकर विभाग तुमचा कापलेला पगार परत करेल.
अशा प्रकारे कापलेला टीडीएस परत मिळवता येणार
- जर पगारातून टीडीएस जास्त कापला गेला असेल तर तो दोन प्रकारे काढता येईल.
- प्रथम, आयटी रिटर्नमध्ये याचा उल्लेख करावा. यानंतर आयटी विभाग स्वत: त्याची दखल घेईल. दुसऱ्या पद्धतीनुसार, टीडीएस काढण्यासाठी फॉर्म १५जी भरावा लागेल.
- फॉर्म १५ जी भरा आणि बँकेत सबमिट करा. अशा प्रकारे तुमचा कापलेला टीडीएस अकाउंटमध्ये परत येईल.
आयकर रिटर्नची स्थिती कशी तपासायची
- आयकर रिटर्नची स्थिती तपासण्यासाठी, सर्वप्रथम, विभागाच्या नवीन अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in वर क्लिक करा.
- त्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.
- जे पेज ओपन होईल त्यात ई-फायलिंगचा पर्याय दिसेल, त्यात आयकर रिटर्न निवडा.
- यानंतर View File Returns वर क्लिक करा. नवीनतम आयटीआर तपशील कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतील.