शिवसेनेच्या विधानसभेतील २/३पेक्षा जास्त आमदारांना आपल्या गटात आणून एकनाथ शिंदे शिवसेना विधानसभा पक्ष ताब्यात घेण्यात यशस्वी होतील, असा दावा केला जात आहे. त्यानंतर भाजपाने त्यांना शिवसेनेच्या मुख्य पक्षावरही ताबा मिळवण्याचा अजेंडा दिला असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. पण एखादा मुख्य पक्ष ताब्यात घेणे बोलावे तेवढे सोपे नसते.