Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना – भाजपा कशी मिळवू पाहणार आवश्यक मते?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dhananjay Mahadik And Sanjay pawar

मुक्तपीठ टीम

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने तिसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. भाजपाने तिसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने शिवसेनेसमोर आव्हान उभं राहिलं आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार!

  • राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे.
  • भाजपाने पियुष गोयल यांना तिसऱ्यांदा राज्यसभेसाठी संधी दिली आहे.
  • सहस्त्रबुद्धे आणि डॉ. महात्मे यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिलेली नाही.
  • भाजपाने दुसऱ्या जागेसाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे माजी आमदार डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे.
  • रविवारी रात्री भाजपाने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर केली.
  • आतापर्यंत शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हे उमेदवार ठरले आहेत.
  • त्यामुळे आता सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

सहाव्या जागेसाठी शिवसेना, भाजपा आमने-सामने!

  • महाराष्ट्रातील राज्यसभा जागासाठीचा कोटा लक्षात घेता भाजपा २, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे पाच उमेदवार आरामात निवडून येवू शकतात. प्रश्न सहाव्या जागेचा आहे.
  • त्या जागेसाठी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
  • आता भाजपानेही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना तिसरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे.

भाजपा – शिवसेनेला किती मते पाहिजेत?

  • विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे.
  • भाजपचे १०६ आमदार असून, पक्षाकडे २२ अतिरिक्त मते आहेत.
  • त्यांनाही काही अपक्षांचा पाठिंबा आहे. तरीही त्यांनाही किमान २० मतांची आवश्यकता असेल.
  • शिवसेनेकडे स्वत:चे ५५ (अंधेरीचे आमदार रमेश लटकेंचं निधन झाल्याने एक कमी) आमदार आणि त्यांना पाठिंबा देणारे इतर ९ असे ६४ चे बळ आहे. त्यामुळे २२ अतिरिक्त आहेत.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना मतं दिल्यानंतर त्या पक्षाकडे किमान १० मते उरतील.
  • तरीही शिवसेनेलाही आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी किमान दहा आमदारांची मते मिळवावी लागतील.
  • सध्याच्या विधानसभेत आघाडीकडे १६९ (आ. लटकेंच्या निधनाने एक कमी) आमदारांचं बळ आहे. त्यामुळे खरंतर आघाडीचे चार उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक १६८ आमदारांचे संख्याबळ त्यांच्याकडे आहे.
  • पण राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाचे उमेदवार वगळता इतरांच्या भूमिकेची खात्री १०० टक्के देता येत नसते.
  • भाजपा आणि शिवसेनेकडे असलेले अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या आमदारांचं बळ राज्यसभा मतदानाच्यावेळी सोबतच असेल असं १०० टक्के गृहित धरता येणार नाही.
  • त्यामुळे त्यांना आपल्याशी बांधून ठेवण्याचं कौशल्यही या पक्षांना पणाला लावावं लागेल.

Tags: BJPDhananjay MahadikKolhapurMaharashtraRajyasabhaSanjay PawarShivsenaभाजपामहाराष्ट्रराज्यसभाशिवसेना
Previous Post

देशभरात कोणत्या राज्यातून कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार? वाचा एका क्लिकवर…

Next Post

ऐसे आमुचे छत्रपती…रयतेचे राजे!

Next Post
Chhatrapati Shivaji Maharaj

ऐसे आमुचे छत्रपती...रयतेचे राजे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!