मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारला मिळालेली १६४ मते कायम राहिली, कारण शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या गटांतर! महाविकास आघाडीला रविवारी मिळालेल्या १०७ मतांपेक्षा सोमवारच्या विश्वासदर्शक ठरावावरील मतदान ८ मते कमी झाल्याचे दिसले. त्यामुळे बांगरांचं एक मत वगळता उरलेली ७ मते कमी कशी झाली अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याचं सर्वात मोठं कारण अध्यक्षांच्या आदेशाने बंद करण्यात आलेले सभागृहाचे दरवाजे हे होते.
मात्र, आघाडीचे मतदान कालपेक्षा आठने कमी झाले असले तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त आमदारांचं मतदान आज होऊ शकलेलं नाही. तसेच सध्या २८७ आमदार असलेल्या विधानसभेत तटस्थ राहिलेल्या ३ आमदारांसह झालेलं मतदान २६६च का झालं, इतर २१ आमदारांचं मतदान का कमी झालं, ते जाणून घेणं महत्वाचं आहे.
विश्वासदर्शक प्रस्तावाच्यावेळी कोण आमदार कुठे?
- सत्ताधारी १६४
- विरोधक ०९९
- तटस्थ ००३
- एकूण २६६
एकूण सदस्य संख्या २८७
तटस्थांसह मतदान २६६
कमी झालेलं मतदान ०२१
मतदानात सहभागी न झालेले २१आमदार कुठे होते?
आजारी
भाजपा
- मुक्ता टिळक
- लक्ष्मण जगताप
(खालीलपैकी बहुसंख्य आमदार अध्यक्षांनी वेळेत दरवाजे बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे सभागृहाबाहेर राहिले, असे सांगण्यात आले)
काँग्रेस आमदार अनुपस्थित
- प्रणिती शिंदे – परदेशी
- जितेश अंतापुरकर – लग्न
अध्यक्षांच्या आदेशाने सभागृहाची दारं बंद झाल्याने बाहेर
- अशोक चव्हाण
- विजय वडेट्टीवार
- झिशांत सिद्दीकी-
- धिरज देशमुख
- कुणाल पाटील
- राजू आवळे
- मोहन हंबर्डे
- शिरीष चौधरी
राष्ट्रवादी काँग्रेस
तुरुंग
- अनिल देशमुख
- नवाब मलिक
गैरहजर
- अण्णा बनसोडे
- संग्राम जगताप
तटस्थ ३
समाजवादी पार्टी
- रईस शेख
- अबू आझमी
एमआयएम
- शाह फारुख अन्वर
तलिका अध्यक्ष ५
- ॲड आशिष शेलार,
- योगेश सागर,
- संग्राम थोपटे,
- संजय शिरसाट,
- चेतन तुपे