मुक्तपीठ टीम
२ ऑक्टोबर १९१८ रोजी महात्मा गांधीजींनी सांगितले होते, “माझ्या मृत्यूनंतर, माझी परीक्षा होईल की मी वाढदिवस साजरा करण्यास पात्र आहे की नाही.” त्यांच्या मृत्यूला सात दशकं उलटून गेल्यानंतरही बापूंचा जन्मदिवस देशभरातच नाही तर जगभरात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. लोकांच्या पिढ्या बदलल्या पण गांधीजयंती साजरे करणे काही थांबले नाही. गांधींजींनीच जे म्हटले त्यानुसार त्यातूनच त्यांचं महात्म्य कळतं.
केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये गांधीजींचे विचार आजही प्रासंगिक मानले जातात. आज अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गांधींजींच्या विचारांवर चर्चा होईल. हा दिवस सुट्टीचा असल्यानं अनेक मस्त त्यांच्यापद्धतीनं तो दिवस घालवतात. तर एक मोठा वर्ग आजही बापूंच्या १५२व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांनुसार वेग-वेगळे सेवाकार्य राबवेल.
गांधी जयंतीच्या दिवशी एक प्रश्न स्वाभाविकच पडतो, प्रत्यक्षात महात्मा गांधी हयात असताना ते स्वत:चा वाढदिवस कसा साजरा करत असत? त्यांना नेमकं काय वाटायचं?
स्वच्छता मोहिमेपासून अहिंसा दिवसापर्यंत
- या दिवशी गांधीवादी सामाजिक संस्था आणि सरकारतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- यामध्ये स्वच्छता मोहिमेपासून अहिंसेपर्यंत, स्वदेशी आणि लोकशाहीवर बोलले जाते.
जेव्हा मृत्यूचा उल्लेख केला
- प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत रामचंद्र राही म्हणतात की गांधीजींनी वाढदिवस साजरा केला नाही, पण लोकांनी केला.
- राहींनी २ ऑक्टोबर १९१८ च्या एका घटनेचा हवाला दिला, की गांधीजींनी सांगितले होते, “माझ्या मृत्यूनंतर, माझी परीक्षा होईल की मी वाढदिवस साजरा करण्यास पात्र आहे की नाही.”
वाढदिवशी महात्मा गांधी काय करायचे?
- महात्मा गांधींचे प्रतीक केवळ झाडूच नाही तर सत्याग्रह, अखंडता आणि अहिंसा इ आहे.
- गांधीजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीही त्यांचे नियमित दिनक्रम पाळायचे.
- ते ठरलेल्या वेळी प्रार्थना करायचे, चरखा फिरवत, लोकांना भेटायचे आणि बहुतेक मौन पाळायचे.
सध्या गांधीजयंतीला काय करतात?
- २ऑक्टोबर रोजी बापूंच्या जन्माची तारीख संयुक्त राष्ट्र संघाने १५ जून २००७ रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केली.
- गांधी जयंतीच्या दिवशी राजधानी दिल्लीतील राज घाट येथे देशातील सर्वोच्च स्तरावर विशेष श्रद्धांजली आणि प्रार्थना सभेचे आयोजन केले जाते.
- यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व प्रमुख राजकारणी महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करतात.