Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वर्धा गर्भपात प्रकरणातील डॉ. नीरज कदमच्या घरात शासकीय औषधांचा साठा कसा? कोण सरकारी साथीदार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Wardha kadam Hospital

मुक्तपीठ टीम

राज्यात गाजत असलेल्या आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी डॉ.नीरज कदम यांना अटक केली आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा सत्र न्यायालयाने डॉ नीरज कदम यांना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तेथे त्यांची चौकशी सुरू आहे. अल्पवयीन मुलीच्या भ्रूणहत्येनंतर उघडकीस आलेल्या गर्भपात प्रकरणातील आरोपींची संख्या ६ झाली आहे. तसेच शनिवारी कदम यांच्या रुग्णालयासह घरात जिल्हा आरोग्य विभागाच्या टास्क फोर्ससह पोलिसांनी झडती घेतली. यात पथकाला मोठ्या प्रमाणात शासकीय औषधांचा साठा सापडला. हा साठा त्याच्याकडे आला कसा, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेतील काही सरकारी अधिकारी, कर्मचारी त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे.

 

कदम यांच्या रुग्णालयासह घरात शासकीय औषधांचा साठा!

  • आर्वी येथील गर्भपात प्रकरणात तपासादरम्यान अनेक बाबी समोर येत आहे.
  • तपासणीदरम्यान मालाईन ड्रगचे २३ खोके, त्यात औषधीचे एकूण २ हजार ५६३ पॅकेट, असे एकूण ७१ हजार ७६४ गोळ्या आढळळ्या आहेत.
  • तर ऑक्सिटिन नामक ९० इंजेक्शन सुद्धा जप्त करण्यात आले आहे.
  • ही सर्व औषधी शासकीय रुग्णालयातील असल्याची माहिती मिळतेय.
  • महत्वाची बाब म्हणजे ही सर्व औषधे मुदतबाह्य असल्याची बाबही समोर आली आहे.
  • शनिवारी सकाळपासून सुरु असलेली तपासणी रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
  • या दरम्यान रुग्णालयातील ऑपरेशन रजिस्टर, एमटीपी रजिस्टर यासह काही फाईल आणि रजिस्टर जप्त केले आहे.
  • रुग्णालयाच्या वरच डॉ. कदम यांचे घर असल्याने तेथेही शुक्रवारी तपासणी करण्यात आलीय.
  • घरात तपासणी केली असता पोलिसांना एक कळवीटची कातडी तसंच अन्य बरंच साहित्य मिळाले.
  • डॉ. कदम यांच्या आई नागपूर येथे रुग्णालयात दाखल आहेत, तिथे त्यांचे वडील असल्याने घराच्या एका खोलीला टाळे होते.
  • त्या खोलीत काय दडलं आहे हे अद्याप समोर आलं नाही.

 

आर्वी येथील आरोग्य विभागसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात

  • या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे.
  • अटक केलेले डॉ. नीरज कदम हे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.
  • कदम रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान सरकारी दवाखान्यात वापरण्यात येणारी औषधं कदम रुग्णालयात आढळल्याने आता आर्वी येथील आरोग्य विभागसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

 

हेही वाचा:

वर्ध्यातील मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी

वर्ध्यातील मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी


Tags: ArviDr Neeraj KadamWardhaआर्वीडॉ.नीरज कदमवर्धा
Previous Post

सटाण्यातील भाजपा पदाधिकारी व मनमाड मधील सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

“शिवरायांच्या अमरावतीतील पुतळ्याची सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना करा!”

Next Post
keshav upadhye on shivaji maharaj statue

"शिवरायांच्या अमरावतीतील पुतळ्याची सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना करा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!