Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत जोडो यात्रा : हे असं कसं…६° कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी फक्त टी शर्टवर?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul gandhi homage

मुक्तपीठ टीम

गेल्या तीन महिन्यांपासू देशभर भारत जोडो यात्रा सुरू आहे. कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा सध्या दिल्लीत आहे आणि काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे. येत्या नवीन वर्षात ३ जानेवारी २०२३ पासून ही यात्रा पुन्हा सुरू होईल. या यात्रेत राहुल गांधींबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. राहुल गांधी सोमवारी अनेक दिग्गज नेत्यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले, तेव्हा कडाक्याच्या थंडीत ते केवळ टी-शर्ट परिधान करून होते. याचीच सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.

भारत जोडो यात्रे’चा संदर्भ देत, काँग्रेस समर्थक ट्विटर यूजर्संनी सांगितले की, ‘या यात्रेच्या रूपात ‘तपश्चर्या’ करत राहिल्यामुळे आणि उत्कृष्ट फिटनेसमुळे, कडाक्याची थंडीही राहुल गांधींवर प्रभावी ठरली नाही.’

राहुल गांधींच्या प्रबळ मनोबळापुढे गरमी आणि थंडीही ठरली अप्रभावी!

  • एका ट्विटर युजरने म्हटलं की, तपश्चर्या करणाऱ्यांना थंडी आणि उष्णता जाणवत नाही. तपस्वी फक्त त्यांच्या तपश्चर्येकडे लक्ष देतात.
  • तसेच, राहुल गांधी फक्त टी-शर्ट परिधान करून राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी जोडले जाण्यासाठी कुठेतरी राजकीय संदेश देत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राहुल गांधींच्या साधेपणावर कॉंग्रेस नेत्यांची प्रशंसा!

  • काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी ट्विट केले की, ६ डिग्री सेल्सिअस तापमानात केवळ टी-शर्टमध्ये कसे राहू शकते?
  • अशा प्रकारचा आत्मसंयम, आत्मशक्ती फक्त संन्याशांची असते.
  • हिवाळ्यात राहुल गांधींच्या या टी-शर्ट अवताराबद्दल विचारले असता, एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, नेते नेहमी तेच कपडे घालतात जे समाजात प्रचलित होते.
  • राहुल गांधींचा टी-शर्ट परिधान करून हा आजच्या तरुणाईशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न आहे.

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज संशोधन कार्यक्रम ‘लोकनीती’चे सह-संचालक संजय कुमार म्हणाले, “राहुल गांधी हिवाळ्यात टी-शर्ट घालून बोलत असताना मला राजकीय संदेश दिसतो. स्वतःला जोडलेले दाखवत आहे. गरीब आणि सामान्य लोकांसारखे कपडे घालतात हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास कुठेतरी राहुल गांधींच्या ‘इमेज मेकओव्हर’ला मदत करत असल्याचे दिसते. हिवाळ्यात त्यांनी फक्त टी-शर्ट आणि पॅन्ट परिधान करणे देखील या प्रयत्नाचा एक भाग म्हणून पाहिले जाते.”


Tags: Bharat Jodo YatraCongressdelhirahul gandhiकाँग्रेसदिल्लीराहूल गाँधी
Previous Post

देशात कोणत्या राज्यात किती कुटुंबांकडे स्वत:ची कार? जाणून घ्या महाराष्ट्रासह सर्व राज्यांची माहिती…

Next Post

माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा – संचालक हेमराज बागूल

Next Post
राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान 1

माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा - संचालक हेमराज बागूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!