Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोच्या कोरोना योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष गृहनिर्माण योजना

ऑनलाइन अर्ज नोंदणीसह भूखंड विक्रीच्या दोन योजनांचा प्रारंभ

August 16, 2021
in घडलं-बिघडलं
0
cidco_bhavan

मुक्तपीठ टीम

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, सिडकोने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या कोरोना योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ १५ ऑगस्ट २०२१ रोजी झाला. त्याचप्रमाणे, भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांचाही प्रारंभ या दिवशी करण्यात आला.

 

“कोरोना योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांनी कोरोना महासाथीचा प्रसार रोखण्यासाठी केलेले कार्य हे अतुलनीय असून त्यांच्या या कार्याला नमन म्हणून सिडकोने राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्याकरिता विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे. अधिकाधिक कोरोना योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांद्वारे अनुक्रमे शहरातील बांधकाम क्षेत्राला चालना मिळण्यासह विविध नोड्समध्ये पेट्रोल पंप/गॅस स्टेशन सुविधा उपलब्ध होणार आहेत”, डॉ. संजय मुखर्जी म्हणाले.

 

कोरोना महासाथीच्या काळात आपल्या प्राणांची पर्वा न करता डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनी अविरपणे आपले कर्तव्य बजावले. कोरोना योद्धे बनून, आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी समाजाप्रतिचे आपले कर्तव्य अव्याहतपणे पार पाडले. या कोविड योद्ध्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी संभाव्य प्राणहानी टळली तसेच अत्यावश्यक सेवांचा नागरिकांना अविरतपणे पुरवठा होत राहिला. या कोविड योद्ध्यांप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून या योद्ध्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने ही गृहनिर्माण योजना आणली आहे.

 

सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या ५ नोड्समध्ये ४,४८८ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एकूण ४,४८८ घरांपैकी १,०८८ घरे ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (ईडब्लूएस) आणि उर्वरित ३,४०० घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत. तसेच वैधानिक तरतुदींनुसार काही घरे ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग प्रवर्गांकरिता राखीव आहेत. या योजनेकरिता अर्ज करण्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांकडे कोविड योद्धा किंवा गणवेषधारी कर्मचारी म्हणून सक्षम अधिकाऱ्याकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.

 

या योजनेच्या अर्ज नोंदणी ते सोडत, अशा सर्व प्रक्रिया सुलभ व पारदर्श अशा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. या योजनेकरिता अर्जदारांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२१ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये पार पडणार आहे, तर योजनेची संगणकीय सोडत १६ सप्टेंबर २०२१ रोजी काढण्यात येणार आहे. योजनेच्या सविस्तर माहितीकरिता अर्जदारांनी https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे (स्कीम बुकलेट) काळजीपूर्वक अवलोकन करावे.

 

भूखंड विक्रीच्या उपरोक्त दोन योजनांपैकी एका योजनेंतर्गत नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल (पू.) आणि नवीन पनवेल (प.) नोडमधील निवासी, निवासी तथा वाणिज्यिक वापराचे एकूण १६ भूखंड भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या योजनेंतर्गत नवी मुंबईतील उलवे, पुष्पक नगर, खारघर, नवीन पनवेल (पू.) आणि कळंबोली नोडमधील एकूण ८ भूखंड हे इंधन भरणा केंद्र (पेट्रोल पंप/सीएनजी स्टेशन) वापराकरिता भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या दोन्ही योजनांसाठी निविदाकारांच्या ऑनलाइन नोंदणीस १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरुवात झाली आहे. सदर दोन्ही योजना या ई-निविदा तथा ई-लिलाव पद्धतीने पार पडणार असून योजनांच्या सविस्तर माहितीकरिता अर्जदारांनी https://eauction.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजना पुस्तिकेचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.


Tags: CIDCOcidco indialotterynavi mumbaiभूखंड विक्री
Previous Post

“ओबीसींच्या आरक्षण प्रकरणात केंद्रसरकारने शुद्ध फसवणूक केली आहे”: शरद पवार

Next Post

राज्यात नवे रुग्ण ४ हजार १४५ नवे रुग्ण, मुंबईत नवे रुग्ण दोनशेखाली!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात नवे रुग्ण ४ हजार १४५ नवे रुग्ण, मुंबईत नवे रुग्ण दोनशेखाली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!