Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटात अनाथ झालेल्या दिव्यांगांना अर्नाळ्यात लाभणार मायेचा आसरा!

‘दिव्यांग मुल, एकल पालक वसतिगृह’ अर्नाळ्यात भूमिपूजन!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Arnala

मुक्तपीठ टीम

कोरोनामुळे पालक गमावलेल्या ‘दिव्यांग’ मुलांसाठी विरारच्या अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. येत्या ३ एप्रिल २०२२ रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन संपन्न होणार आहे. या वसतिगृहाची निर्मिती ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशनद्वारे करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ‘दिव्यांग कल्याण आयुक्तालया’ने या उपक्रमास मान्यता आहे. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील ‘दिव्यांग’ बालकासह त्याच्या एकल पालकाच्या’ निवासाची व्यवस्था असणार आहे. निवासासोबतच मार्गदर्शन, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी देणारे बहुदा हे पहिले वसतिगृह असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा, विश्वस्त नूतन गुळगुळे यांनी सांगितले आहे. ‘स्वानंद सेवा सदन’ असे या वसतिगृहाचे नाव असणार आहे.

दिव्यांग मुलांच्या दैनंदिन संगोपन गरजा अत्यंत वेगळ्या असल्याने हा उपक्रम राबविण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या मुलांच्या अडचणी लक्षात घेऊनच त्यांच्या वसतिगृहाच्या निर्मिती केली जाणार आहे. त्यांना आवश्यक असलेल्या सर्व सोई सुविधायुक्त अशी निर्मिती करावी लागणार आहे. या उपक्रमाच्या निर्मितीत लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता असून लोकवर्गणीतून विशेष वसतिगृहच्या निर्मितीस पाठबळ मिळावे, समाजातील संवेदनशील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे अशी इच्छा अध्यक्षा सौ. गुळगुळे यांनी व्यक्त केली आहे.

या प्रसंगी सन्माननीय मुख्य उपस्थिती मा. राजेंद्र गावित( खासदार पालघर जिल्हा), मा. हितेंद्र ठाकूर (आमदार विरार, पालघर जिल्हा), मा. सुनील देवधर(राष्ट्रीय सचिव – भाजपा), मा. डॉ. जगन्नाथ हेगडे( माजी नगरपाल – मुंबई), तसेच विशेष निमंत्रित मा. डॉ. सतीश वामन वाघ(अध्यक्ष सुप्रिया लाइफफायनान्स लिमिटेड), मा. डॉ. संजय दुधाट(कर्करोग तज्ञ), मा. डॉ. निशिगंधा वाड( शिक्षणतज्ज्ञ, अभिनेत्री) यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी स्वप्नील पंडित प्रस्तुत मराठी व हिंदी गीतांच्या संगीतमय ‘मेघ मल्हार’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Arnalacoronagood newsHostelmuktpeethNutan Gulgule FoundationOrphan DivyangSwanand Seva Sadanअनाथ दिव्यांग बालकअर्नाळाकोरोनाचांगली बातमीदिव्यांग मुलनूतन गुळगुळे फाऊंडेशनमुक्तपीठवसतिगृहस्वानंद सेवा सदन
Previous Post

राज्यात १०३ नवे रुग्ण, १०७ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post

एअरटेलचे 5Gतील अचाट आणि अफाट प्रयोग, साकारली कपिल देवच्या १७५ धावांची व्हर्च्युअल स्टेडियम खेळी!

Next Post
Airtel 5G

एअरटेलचे 5Gतील अचाट आणि अफाट प्रयोग, साकारली कपिल देवच्या १७५ धावांची व्हर्च्युअल स्टेडियम खेळी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!