Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिंगापूरची साथ, महाराष्ट्रात हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर, डिझाईन अँड फ्लो प्रशिक्षण

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Temasek Foundation,

मुक्तपीठ टीम

सिंग हेल्थ म्हणजेच सिंगापूर मधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था. हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, डिझाईन अँड फ्लो या प्रकल्पातून महाराष्ट्रातील दहा विशेष तज्ज्ञ आणि दहा आरोग्य व्यवस्थेतील प्रमुखांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात प्रत्येकी पाच दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पाच दिवस सिंगापूर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या रुग्णालयात प्रशिक्षण दिले जाणार आहे. रुग्णाचा प्रवास, रुग्णाची सुरक्षितता, गुणवत्ता सुधारणा, आरोग्य व्यवस्थेचे प्रशासन या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

टेमासेक फाऊंडेशन, सिंग हेल्थ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढवण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

टेमासेक फाऊंडेशन, सिंग हेल्थ आणि महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभागाच्या वतीने आयेाजित केला जाणारा हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, डिझाईन अँड फ्लो कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी राजेश टोपे बोलत होते.

दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात टेमासेक फाऊंडेशनचे समुह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो, आयव्ही, टेमासके फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनेडिक्ट थेओंग, प्रो. टँग, प्रो. ओंग,  विजया राव आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
सार्वजनिक आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, सिंग हेल्थ आणि टेमासिक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा प्रशिक्षण उपक्रम ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे परिचालन आणि रुग्ण सेवेचा दर्जा उंचावण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल. राज्यातील आरोग्य व्यवस्थेत चांगले बदल आणण्यासाठी सिंग हेल्थने महाराष्ट्रात सेंटर फॉर एक्सलन्स उभे करावे. राज्यातील सार्वजनिक रुग्णालये आणि सिंग हेल्थ यांच्या सहकार्यातून राज्यातील आरोग्य व्यवस्थेत विविध सेवा प्रारुपे विकसित करण्यासाठी सहकार्य केले जावे, अशी अपेक्षाही टोपे यांनी व्यक्त केली.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: MaharashtraRajesh Topesing healthTemasek Foundationटेमासिक फाऊंडेशनमहाराष्ट्रराजेश टोपेसिंग हेल्थ
Previous Post

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीचं पावित्र्य जपण्यासाठी रावेरकरांची अंदमान वारी!

Next Post

औष्णिक वीज केंद्रात आता इंधनासाठी बांबूचाही वापर, प्रदूषण घटणार! शेतकरी सुखावणार!!

Next Post
Bamboo plantation

औष्णिक वीज केंद्रात आता इंधनासाठी बांबूचाही वापर, प्रदूषण घटणार! शेतकरी सुखावणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!