मुक्तपीठ टीम
अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईजवळच्या तेल विहिरींवर काम करणाऱ्या ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. या चक्रीवादळाच्या कचाट्यात सापडलेल्या बार्ज पी ३०५ वरील ४९ क्रू मेंबर अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. रात्रंदिवस या लोकांचा शोध घेण्यात नौदल कार्यरत आहेत. नौदलाप्रमाणेच संपूर्ण देशातील नागरिकांना आशा आहे की समुद्रात हरवलेली आपली माणसं नक्की सापडतील आणि आपल्या कुटुंबाकडे सुखरुप परततील. लोक त्यांच्या सुरक्षितेसाठी प्रार्थना करत आहेत. भुतकाळात समुद्रात बेपत्ता झालेले असे अनेक बऱ्याच दिवसांनंतरही सुखरुप सापडल्याच्या घटनांची आठवण करुन दिली जात आहे.
समुद्रात काम करणारे याआधीही असे बेपत्ता झाले आहेत. त्यांच्यातील अनेक काही दिवसांनी सुखरुप परतले आहेत. त्यातील काही तर कित्येक दिवसांनीही समुद्रातून परतले आहेत. जीवन जगण्यासाठी प्रतिकुलतेचा मुकाबला करण्याचे धाडस आणि धैर्य असेल तर अशक्य काही नसतं. यावेळीही तसेच घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#CycloneTauktae#Update
Search & Rescue Ops Barge P305 continued through the night by #INSKochi & #INSKolkata. Offshore Support Vessel Energy Star & Great Ship Ahalya have joined the effort.
132 personnel rescued so far in extremely challenging circumstances.@DefenceMinIndia https://t.co/9fbs7g8STl— SpokespersonNavy (@indiannavy) May 18, 2021
देव तारी त्याला कोण मारी…साथीला हिंमत असावी!
• ४३८ दिवस
मेक्सिकोच्या किनाऱ्यावर चक्रीवादळामुळे बोट भरकटली, तिची मोटार ब्रेक झाल्यानंतर जोस साल्वाडोर अल्वरेंगा ४३८ दिवस समुद्रात बेपत्ता होता. त्याचा सहकारीही मरण पावला. तरीही जोसने हिंमत राखली. समुद्रातील जलचर, पक्षी खाऊन त्याने तग धरला. अखेर तो सुखरुप परतला.
• १३३ दिवस
चीनचा पून लिम १३३ दिवस समुद्रात भटकत होता. अखेर तो सुखरुप परतला.
• ७६ दिवस
ट्रान्साटलांटिक नौका यात्रेवर असलेल्या स्टीव्ह कॉलहानची बोट बुडाली. पुढचे ७६ दिवस त्याने इन्फ्लॅटेबल लाइफ राफ्टवर समुद्रात घालवून तो सुखरुप परतला.
• २५ दिवस
डिसेंबर २००८ मध्ये समुद्रावर गेलेली एक छोटी थाई फिशिंग बोट हरवली. या बोटीमध्ये २० जण होते. सुमारे २५ दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाच्या हॉर्न आइसलँडजवळ एका कस्टम्स विमानाला एक आईस बॉक्समध्ये त्यांच्यातील दोन सापडले.