Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! ज्वेलर तरुणीकडून फसला, लुटला…’तो’ हनीट्रॅप असतो तरी काय?

February 10, 2021
in कायदा-पोलीस
0
Honeytrap-1

मुक्तपीठ टीम

 

मुंबईजवळील वसईमध्ये एका ज्वेलर्सला हनी ट्रॅपमध्ये अडकून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही महिलांनी ज्वेलर्सला आपल्या जाळ्यात अडकवले होते, पण ज्वेलर्सने या दोन्ही महिलांना कायमचा चांगलाच धडा शिकवला.

 

वसई येथील एक ज्वेलर्सच्या दुकानात दागिणे गहाण ठेवण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपी प्राजक्ता पाटील ही आली होती. यावेळी प्राजक्ता पाटीलने ज्वेलरशी बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी  ज्वेलरला आपल्या घरी बोलावले होते. यावेळी या महिलेने त्याच्याशी जवळीक साधली. त्यानंतर शेजारच्या खोलीतून आरोपी ज्योती उपाध्यायसह दुसरा एका पुरुष आरोपी आला. त्यांनी त्याच्या जवळीकीचा व्हिडीओ बनवल्याचे सांगितले.

 

त्यानंतर ज्वेलरला तो व्हिडीओ दाखवून पैसे देण्यास धमकावण्यात आले. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पैसे दिले नाहीतर हा व्हिडीओ तुझ्या कुटु्ंबीयांना दाखवला जाईल, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल केला जाईल, अशी धमकी दिली. अखेर ज्वेलरने ऑनलाईन साडेचार हजार रुपये दिले. तसंच आरोपींनी त्याच्याकडून दागिनेही हिसकावून घेतले.

 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आरोपींनी ज्वेलरला वारंवार फोन करून पैशांची मागणी केली. अखेर ज्वेलरने हिंमत करून वालाव पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या घरावर छापा टाकून आरोपी महिला प्राजक्ता पाटील आणि ज्योती उपाध्याय या दोघींना अटक केली. परंतु, यादरम्यान त्यांचा पुरुष साथीदार आरोपी घटनास्थळावरून पळाला. या प्रकरणी पोलिसांनी  चार आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४ ४, ४ ३६४(अ), ४ ३८४ आणि ५ ३८५ (खंडणी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हनी ट्रॅप म्हणजे काय?

  • एखाद्या पुरुष सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी सुंदर स्त्रीचा आमिषासारखा वापर केला जातो, त्याला हनी ट्रॅप म्हणतात.
  • हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकारी, प्रभावशाली, श्रीमंत पुरुषांना सदर महिलेकडून गोडीगुलाबीने चलाखीने माहितीसाठी वापरून घेतले जाते
  • काहीवेळा पुरुष सहकार्य करत नाहीत तेव्हा मात्र हनी ट्रॅप कटानुसार घडवलेल्या संबंधांचे व्हिडीओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जातात. इप्सित साध्य केले जाते.
  • जागतिक पातळीवर लष्करी हेरगिरी, कॉर्पोरेट हेरगिरी, राजकीय हेरगिरी यात हनी ट्रॅपचा शस्त्रासारखा वापर केला जातो.
  • भारतातही राजकीय नेत्यांचे करिअर संपवण्यासाठी किंवा निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर करतात

 


Tags: honey traphoney trap in marathiwhat is honeytrapब्लॅकमेलिंगमराठीत हनी ट्रॅपवसईहनी ट्रॅप
Previous Post

तामिळनाडूच्या राजकीय मेलोड्रामात जुन्या नायिकेचा नवा प्रवेश!

Next Post

‘हाफकिन’चे लस संशोधनासाठी पाच वर्षात पाच प्रकल्प

Next Post
Haffkine Institute -1

'हाफकिन'चे लस संशोधनासाठी पाच वर्षात पाच प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!