मुक्तपीठ टीम
मानदुखी ही एक सामान्य समस्या आहे. काही हालचाली अशा असतात ज्यामुळे मानेच्या स्नायूंमध्ये दुखणे निर्माण होते. जसे की, संगणकावर बराच वेळ काम करणे, झोपताना बराच वेळ मोबाईल बघणे, उंच आणि जाड उशीचा वापर करणे या सवयींमुळे हे मानेचे दुखणे उद्भवते. काही वैद्यकीय कारणांमुळे देखील मानदुखी होऊ शकते, जसे की संधिवात. मानदुखी हे आपल्या शरीराची असणारी रचना आणि वैद्यकीय स्थितींचे एक सामान्य लक्षण आहे.
जर एका आठवड्यापेक्षा जास्त काळ मान दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या प्रकारच्या वेदनांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. या वेदनेने जखडलेले लोक सतत त्रस्त असतात. मान दुखणे खूप सामान्य मानले जाते. ही समस्या, वयानुसार विकसित होण्याची शक्यता देखील वाढते.
मानदुखीच्या वेदना कशाप्रकारे जाणवतात?
- मानेला सतत वेदना
- मानेला हात लावताच दुखणे आणखी वाढणे
- मानदुखीसह डोकेदुखी आणि बधीरपणा येणे किंवा एक किंवा दोन्ही हातांना मुंग्या येणे
- मानेतील स्नायूंचा ताण वाढणे
बहुतेक प्रकरणांमध्ये, मानदुखी ही गंभीर वैद्यकीय स्थिती नसते आणि ती सामान्यतः काही दिवसात बरी होते. परंतु काही प्रकरणांमध्ये, मानदुखी हे गंभीर दुखापत किंवा आजाराचे लक्षण असू शकते ज्यास वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असते. जर मानेचे दुखणे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकत असेल, गंभीर असेल किंवा इतर लक्षणांसह असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मानदुखीवरील घरगुती उपाय
- गरम पाण्याची पिशवी किंवा बर्फचा पॅक वापरणे
- हळूहळू मानेचा व्यायाम करणे
- वेदनाकमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेणे
- विश्रांती करणे
- शारीरिक हालचाली तात्पुरत्या बंद करणे