मुक्तपीठ टीम
चेहऱ्यावरील डेड सेल्सखाली साचलेले तेल त्वचेवर लहान मुरुमांच्या रूपात बाहेर पडू लागतात. हवेच्या संपर्कात आल्यानंतर ऑक्सिडायझेशनमुळे त्वचा काळी पडू लागते. त्यांना ब्लॅकहेड्स असं म्हणतात. नाकाजवळील ब्लॅकहेड्स काढणे खूप कठीण असतात कारण, ते त्वचेला चिकटलेले असतात आणि सहजासहजी बाहेर पडत नाहीत. पण ब्लॅकहेड्स काढण्यासाठी काही सोपे घरगुती उपायही आहेत.
ब्लॅकहेड्स काढण्याचे सोपे आणि घरगुती उपाय…
१. दररोज चेहरा क्लिंझरने स्वच्छ करा
- चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, घाण आणि इतर समस्या दूर करण्यासाठी दैनंदिन स्वच्छता महत्वाची आहे.
- ज्यामुळे ब्लॅकहेड्स कमी होऊ शकतात.
- ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी, चेहरा क्लिंझरने स्वच्छ करणे आवश्यक आहे.
- ते घाण आणि तेल काढून टाकतात आणि इतर उपचारांसाठी त्वचा तयार करतात.
२. अंड्याने ब्लॅकहेड्स काढा
- एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला.
- हे मिश्रण ब्लॅकहेड्सवर लावा आणि १५-२० मिनिटे कोरडे होऊ द्या.
- नंतर ते कोमट पाण्याने धुवा आणि आठवड्यातून दोनदा तसं करा.
३. बेकिंग सोडा
- एका चमचा बेकिंग सोडामध्ये दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर वापरा.
- १०-१५ मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.
- हे मिश्रण एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि चेहऱ्यावरील तेल शोषण्यास देखील मदत करते.
४. ग्रीन टी
- एक चमचा ग्रीन टीची पाने घेऊन त्यात पाण्यात मिसळून पेस्ट बनवा, त्यानंतर हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.
- कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा, हे खूप उपयुक्त ठरेल.
५. केळीची साल
- केळी खाल्ल्यानंतर अनेकदा लोक साले फेकून देतात, पण यामुळे ब्लॅकहेड्स सहज दूर होऊ शकतात. यासाठी ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी केळीच्या सालीचा आतील भाग चोळल्याने फायदा होईल.
६. हळदचा वापर हा लाभदायी
- हळद ही आयुर्वेदिक औषध आहे.
- चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
- यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट ब्लॅकहेड्स दूर करण्यात प्रभावी ठरतात.
- हे लागू करण्यासाठी, हळदीमध्ये खोबरेल तेल मिसळा आणि पेस्ट तयार करा आणि १०-१५ मिनिटे त्या ठिकाणी लावा.
- त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.