Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांचे गृहमंत्री देशमुखांकडून अभिमंदन

March 31, 2021
in सरकारी बातम्या
0
Anil-deshmukh

मुक्तपीठ टीम

उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीत गडचिरोली पोलीसांनी विशेष मोहिम राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ जहाल नेत्यासह पाच नक्षलवादी ठार झाले. या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवानांचे विशेष अभिनंदन केले.

या भागात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या आधारे गडचिरोली पोलीस अधिक्षक अंकित गोयल व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. त्यांचा पुर्णपणे बिमोड करण्यासाठी हे नक्षल विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.

 

पोलीस- नक्षल चकमक

मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांनी नक्षलविरोधी अभियानाची आखणी केली. त्यानुसार कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली मौजा खोब्रामेंढा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 च्या जवानांनी नक्षलविरोधी कारवाई सुरु केली. त्यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या 40 ते 50 नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढविला. सी-60 जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलीसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळी 3 पुरुष नक्षलवादी व 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले असून मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.

 

43 लाख रुपयांचे बक्षीस

यात मृतक नक्षलवाद्यांवर जवळपास 43 लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलीसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत सदर घटनास्थळी एक एके-47 रायफल, एक 12 बोअर रायफल, एक 303 रायफल, एक 8 एमएम रायफल तसेच मोठया प्रमाणात नक्षलवादयांच्या दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले. मृत नक्षलवाद्यांची ओळख पुढील प्रमाणे आहे.

1) रुषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी वय-46 वर्ष रा. जवेली (बु.) पोस्टे जारावंडी (डीकेएसझेडसीएम) टिपागड एलओएस पदावर कार्यरत होता. याच्यावर एकुण- 155 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 41 गुन्हे, चकमकीचे – 78 गुन्हे, दरोडा-1 विविध जाळपोळीचे- 16 गुन्हे, व इतर-19 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकुण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

2) राजु ऊर्फ सुखदेव बुधेसींग नैताम वय-32 वर्ष रा. मरकेगाव पोमके सावरगाव टिपागड एलओस उपकंमाडर या पदावर कार्यरत होता. एकुण- 14 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 05 गुन्हे, चकमकीचे – 03 गुन्हे, जाळपोळीचे- 03 गुन्हे, दरोडा-01 व इतर -02 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकुण 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

3) अमर मुया कुंजाम वय-30 वर्ष रा. जागरगुडा बस्तर एरीया (छ.ग.) पार्टी मेंबर कसनसुर एलओएस या पदावर याच्यावर एकुण- 11 गुन्हे दाखल असुन यात चकमकीचे 08 गुन्हे व इतर -03 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकुण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

4) सुजाता ऊर्फ कमला ऊर्फ पुनीता गावडे ऊर्फ आनाम वय-38 वर्ष रा. कापेवंचा उपपोस्टे राजाराम (खां.) टिपागड एलओएस प्लाटुन क्र. 15 ची पार्टी मेंबर हिचेवर एकुण- 31 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 11 गुन्हे, चकमकीचे – 11 गुन्हे, व इतर -09 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिचेवर एकुण 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

5) अस्मीता ऊर्फ सुखलु पदा वय – 28 वर्ष रा. गुर्रेकसा पोमके कटेझारी टिपागड एलओएस पार्टी मेंबर हिचेवर एकुण-11 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 01 गुन्हे, चकमकीचे – 05 गुन्हे, जाळपोळीचे- 02 गुन्हे व इतर – 03 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिचेवर एकुण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

 


Tags: anil deshmukhGadchiroli policeअनिल देशमुख
Previous Post

सागरी व्यापार क्षेत्रात रोजगार व पर्यटनाच्या असंख्य संधी

Next Post

घर जळाले, सारे खाक झाले…मदतीला दुर्गमित्र धावले!

Next Post
thane

घर जळाले, सारे खाक झाले...मदतीला दुर्गमित्र धावले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!