मुक्तपीठ टीम
राज्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग याच्या पत्रानंतर विरोधी पक्ष सातत्याने महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधी पक्षाकडून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे १५ फेब्रुवारी रोजी होम क्वारंटाईनमध्ये होते असं शरद पवारांनी म्हटले होते. तुम्ही म्हणता तर मग देशमुखांनी पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडीओ ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख काय बोलले ट्विट केलेल्या व्हिडीओ संदेशात?
- गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत.
- इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियातून चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी फार व्यथित झालो आहे.
- कोरोनाच्या संपूर्ण एक वर्षाच्या कार्यकाळात आमच्या पोलीसांचे मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
- ५ फेब्रुवारीला मी कोरोना बाधित झालो.
- त्यानंतर ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत मी नागपूरच्या ऍलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल होतो.
- १५ फेब्रुवारीला मला डिस्चार्ज मिळाला तेव्हा मी खाजगी विमानाने होम क्वारंटाईनसाठी नागपूरहून लगेच मुंबईत आलो.
- होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
- नागपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये असताना आणि मुंबईत होम क्वारंटाईन असताना मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका आणि कार्यक्रमात सहभागी झालो.
- होम क्वारंटाईननंतर मी १ मार्चपासून जे अधिवेशन होतं त्याच्या कामाला लागल्याचे देशमुख म्हणाले.
- त्या दरम्यान अधिवेशनासाठी आमची जी प्रश्नोत्तरं होती. लक्षवेधी सूचना होत्या. त्याच्या मीटिंगसाठी माझ्या शासकीय निवासस्थानी अनेक अधिकारी येत होते.
- माझ्या शासकीय कामासाठी मी पहिल्यांदा २८ फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडलो. ज्या पद्धतीने जनतेमध्ये चुकीची माहिती देण्याचा किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा अनेक मंडळी प्रयत्न करतायत त्यासाठी माहिती देत आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 23, 2021
फडणवीसांचे आरोप
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला आहे.
- “देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता.
- १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. यातून फडणवीस यांना परमबीर सिंग यांनी केलेला दावा खरा असल्याचं म्हटलं आहे.