Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

राज्यात तातडीने ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करा! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

August 12, 2022
in घडलं-बिघडलं
0
Press Conf-HJS_Dharmantar issue_Palghar

मुक्तपीठ टीम

पालघर जिल्हयातील डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल’, असे सांगत आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एका हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्‍यांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी ४ मिशनर्‍यांना अटक केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून चालू आहेत. राज्याची राजधानी मुंबईपासून जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यात अशा घटना घडणे, हे अत्यंत गंभीर आहे. धर्मांतराची समस्या ही केवळ राज्याची नव्हे, तर देशाची मोठी समस्या आहे. स्वा. सावरकरांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतरच’ असे म्हटले होते. पुन्हा भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर धर्मांतरबंदी व्हायलाच हवी. यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पालघर येथील गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक बळवंत पाठक उपस्थित होते.

डॉ. उदय धुरी पुढे म्हणाले की, यापूर्वीही पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांत आदिवासी हिंदूंचे धर्मांतर केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे हिंदू आणि धर्मांतरित हिंदु यांच्यात सण-उत्सव साजरे करण्यावरून वारंवार वाद निर्माण होत आहेत. पोलीस आणि प्रशासन यांनी धर्मांतराचे असे प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना काढावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनीही केली आहे. ‘लंगडा चालू लागेल’, ‘आंधळ्याला दिसू लागेल’ आदी धादांत खोटा प्रचार करणार्‍या ‘चंगाई सभां’चा देशभरात सुळसुळाट चालू आहे. या सभांतून गोरगरीब हिंदूंना धर्मांतरित केले जाते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असूनही अशा खोट्या चमत्कारांचा प्रसार मिशनर्‍यांनी उघडपणे चालवला आहे. याविषयी राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलनाचा ठेका घेतलेली अंनिस पण गप्प आहे. तरी असे चमत्कार दाखवून भोळ्या हिंदूंना फसवणार्‍या पाद्र्यांवर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही यानिमित्ताने आम्ही करत आहोत.

देशभरात धर्मांतरबंदी कायदा करण्याविषयी आम्ही केंद्र सरकारकडेही यापूर्वीच मागणी केली आहे. आपल्या देशात प्रतीवर्षी १० लाख हिंदू धर्मातरीत होत आहेत. नागालँड, मिझोराम, मेघालय, अरूणाचल प्रदेश, मणिपूर ही राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेत. अनेक राज्यांत धर्मांतराच्या घटनांमुळे ख्रिस्ती लोकसंख्या वाढत चालली आहे. भारतात हिंदु नऊ राज्यांमध्ये अल्पसंख्य झाले आहेत. अहिंदु लोकसंख्येच्या विस्फोटाचा परिणाम देशाच्या धार्मिक संतुलनावर होत आहे. आधीच देशात लव्ह-जिहादच्या माध्यमातून हिंदु युवतींच्या धर्मांतराची समस्या ज्वलंत आहे. त्यात ख्रिस्ती धर्मांतरेही मोठ्या प्रमाणात चालू आहेत यांवर आता नियंत्रण आणायला हवे, असे सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत यावेळी म्हणाल्या.


Tags: Balwant PathakMaharashtraProhibition of Conversion Actधर्मांतरबंदी कायदानयना भगतबळवंत पाठकमहाराष्ट्रमुंबईसनातन संस्थाहिंदु जनजागृती समिती
Previous Post

नाव असलेल्या प्लॉस्टिक पिशवीसाठी सहा रुपयांची वसुली, ग्राहक आयोगाचा ३१ हजार दंड!

Next Post

अटल पेंशन योजनेत मोठा बदल, आयकरदाता असाल तर योजनेपासून वंचित!

Next Post
Atal Pension Yojana

अटल पेंशन योजनेत मोठा बदल, आयकरदाता असाल तर योजनेपासून वंचित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!