Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘चित्रगुप्त’ आणि ‘यमदेवता’ यांच्या तोंडी फालतू विनोद! ‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदीची हिंदू जनजागृती समितीची मागणी

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Thank God

मुक्तपीठ टीम

अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच यू-ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हिंदु धर्मातील मृत्यूनंतर प्रत्येकाच्या पाप-पुण्याचा हिशोब करणार्‍या ‘चित्रगुप्त’ देवता आणि मृत्यूनंतर आत्म्याला घेऊन जाणारी ‘यमदेवता’ यांना आधुनिक स्वरूपात दाखवले आहे. त्यांच्या तोंडी फालतू विनोद दिलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्मातील चित्रगुप्त आणि यम देवता यांची टिंगल आम्ही कदापि सहन करणार नाही. सेन्सॉर बोर्ड हा ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत झोपले होते का ? सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून याला विरोध करू, असा इशारा देतानाच राज्य, तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने धार्मिक भावना दुखावणार्‍या या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

या चित्रपटाद्वारे हिंदूंच्या धार्मिक संकल्पना आणि देवता यांची टिंगल करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील काही दृष्ये अन् संवादच समोर आले आहेत. प्रत्यक्षात पूर्ण चित्रपटात आणखी आक्षेपार्ह संवाद असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या चित्रपटात अजय देवगण यांना सुट-बुट घातलेले मॉडर्न ‘चित्रगुप्त’ दाखवले असून यमदूतांना ‘वाय.डी.’ (YD) असे नावाचा अपभ्रंश करून संबोधले आहे. हिंदु धर्म शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर चित्रगुप्त त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब करतात. असे असतांना या संकल्पनेची मोडतोड करून सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्याचा मृत्यू झालेला नसतांना त्याला चित्रगुप्ताच्या दरबारात नेलेले दाखवले आहे. तेथे चित्रगुप्त त्याच्याशी ‘गेम ऑफ लाईफ’ खेळताना दाखवले आहे. एकूणच हिंदु धर्मांतील एका उदात्त संकल्पनेला ‘कॉमेडी’च्या नावाखाली चुकीच्या आणि आक्षेपार्ह पद्धतीने दाखवून त्याची टिंगल करण्यात आली आहे.

यापूर्वीही ‘पीके’, ‘ओ माय गॉड’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘तांडव’ यांसारख्या अनेक चित्रपट अन् वेब सिरीज यांमधून हिंदु धर्म, देवता, साधूसंत यांना लक्ष्य केले गेले. हिंदूंच्या प्रथा-परंपरांविषयी विनोद करून त्यांविषयी घृणा निर्माण केली जाते. हे सर्व रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. तसेच सेन्सॉर बोर्डामध्येही धार्मिक प्रतिनिधी असायला हवेत, जे धार्मिक भावनांचा अनादर होऊ नये, याची काळजी घेतील, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने केली आहे.


Tags: Ajay devganchitraguptaThank GodYamdevअजय देवगणचित्रगुप्तथँक गॉडयमदेवताहिंदू जनजागृती समिती
Previous Post

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अभियंता पदांवर ३३० जागांसाठी करिअर संधी

Next Post

देशाच्या एक वर्षानंतर स्वतंत्र झाला मराठवाडा…दुर्लक्ष आजही तसंच!

Next Post
Marathwada muktidin

देशाच्या एक वर्षानंतर स्वतंत्र झाला मराठवाडा...दुर्लक्ष आजही तसंच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!