Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जवानांची कमाल… पहिल्यांदाच उघडला ५९ दिवसात हिमालयातील रस्ता

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
BRO

मुक्तपीठ टीम

हिमालयातील अतिउंचावरील रस्ते हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे बंद होतात. तेथे साचलेले बर्फ काढून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओ ते पुन्हा खुले करते. दरवर्षी जोजिला मार्ग हा लडाखला उर्वरिक देशाशी जोडणारा रस्ता उघडण्यासाठी किमान तीन ते पाच महिने लागतात. पण यावेळी चीनचे संकट सीमेवर असल्यामुळे बीआरओच्या जवानांनी आव्हान समजून फक्त दोन महिन्यात तो रस्ता खुला केला आहे.

जोजिला मार्ग प्रथमच फक्त ५९ दिवसात वाहतुकीसाठी हा खुला करण्यात आला आणि एक विक्रम झाला आहे.

 

अतिउंचावर अतिअवघड रस्ता!

  • मार्ग हा ११,६५० फूट उंचीवर आहे.
  • जोजिला हा एक रणनीतीच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे.
  • तो लडाखला उर्वरित देशाशी जोडतो.
  • हिमवर्षावानंतर तो रस्ता दरवर्षी नोव्हेंबरच्या मध्यात बंद होतो.
  • त्यानंतर तो मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उघडला जाऊ शकतो.

 

यावर्षी बीआरओने (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) ५९ दिवसात हा मार्ग उघडून विक्रम केला आहे. जोजिला मार्ग सरासरी ९० ते १५० दिवस बंद असतो. चीनच्या कुरापतखोरीमुळे सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांमध्ये वाढ केली आहे. सैनिकांना लॉजिस्टिक सपोर्ट लवकर आणि चांगला मिळण्यासाठी जोजिला खिंड वेळेच्या अगोदर उघडली गेली आहे.

 

बर्फवृष्टीच्या वेळी लडाख-श्रीनगर महामार्ग ३० ते ४० फूट बर्फाने व्यापलेला असतो. तापमान उणे ३० अंशांपर्यंत पोहोचते. यामुळे लडाखचा देशाच्या इतर भागाशी असलेला संपर्क तुटतो. पण यावेळी सोनमर्ग ते गुमरी या २६ किमी लांबीच्या रस्त्यावरून अवघ्या १४ दिवसात बर्फ काढून बीआरओने एक वेगळा विक्रम नोंदविला आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BROजोजिला मार्गबॉर्डर रोड ऑर्गनायझेशनहिमालय
Previous Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : सव्वा सहा हजारावर नवे कोरोना रुग्ण, पावणे सहा हजार कोरोनामुक्तही झाले!

Next Post

कम्युनिस्ट सत्तेतील केरळात कॉर्पोरेट राजकारणाचा ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ प्रयोग

Next Post
kerala

कम्युनिस्ट सत्तेतील केरळात कॉर्पोरेट राजकारणाचा ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ प्रयोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!