मुक्तपीठ टीम
एअरटेल, व्होडाफोन-आयडियानंतर आता टीव्ही दर्शकांना महागाईचा फटका बसणार आहे. १ डिसेंबरपासून देशात टीव्ही पाहणे महाग होणार आहे. कारण १ डिसेंबरपासून निवडक चॅनेलच्या किंमती वाढणार आहेत. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना हे चॅनेल पाहण्यासाठी ५० टक्के जास्त किंमत मोजावी लागेल. देशातील प्रमुख प्रसारण नेटवर्क झी, स्टार, सोनी, वायकॉम १८ ने त्यांच्या काही चॅनेलला दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) प्रस्तावित यादीतून वगळले आहे. याचा परिणाम मंथली डायरेक्ट टू होम म्हणजेच डीटीएच रिचार्जवर दिसून येईल.
कोण-कोणते चॅनल होणार महाग
- स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारख्या मनोरंजन श्रेणीतील चॅनेल पाहण्यासाठी ग्राहकांना ३५ ते ५० टक्के जास्त पैसे द्यावे लागतील.
- सध्या या वाहिन्यांची दरमहा सरासरी किंमत ४९ रुपये आहे, ती वाढवून ६९ रुपये प्रति महिना केली जाऊ शकते.
- सोनी चॅनल पाहण्यासाठी ३९ रुपयांऐवजी ७१ रुपये प्रति महिना मोजावे लागतील.
- त्याचप्रमाणे झी वाहिनीसाठी ३९ रुपयांऐवजी १ डिसेंबरपासून दरमहा ४९ रुपये आकारले जातील.
- वायकॉम १८ चॅनेलसाठी, तुम्हाला २५ रुपयांऐवजी ३९ रुपये प्रति महिना भरावे लागतील.
ब्रॉडकास्टरचे होत होते नुकसान म्हणून, किंमतीत वाढ
- ट्रायच्या निश्चित दर यादीमुळे ब्रॉडकास्टरचे नुकसान होत होते.
- यामुळे ब्रॉडकास्टरने ट्रायच्या बुके लिस्टमधून काही चॅनेल वगळून नवीन दर निश्चित केले आहेत.
- मूळ समस्या ही ट्रायच्या नवीन टॅरिफ ऑर्डरची होती.
- ब्रॉडकास्टिंग नेटवर्कद्वारे ज्या वाहिन्यांचे मासिक मूल्य १५ ते २५ रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आले होते, ते ट्रायच्या नवीन टॅरिफ ऑर्डरमुळे किमान १२ रुपये निश्चित करण्यात आले होते.
- अशा परिस्थितीत, ब्रॉडकास्टरने तोटा भरून काढण्यासाठी टॅरिफमध्ये डीटीएच रिचार्जमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.