मुक्तपीठ टीम
एअरटेल आणि वोडाफोनच्या दरवाढीनंतर रिलायन्स जियोनेही आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. जियोचे नवीन टॅरिफ प्लॅन १ डिसेंबर २०२१ पासून देशभर लागू होणार आहेत. यामध्ये डेटा प्लॅन, अनलिमिटेड कॉल प्लॅन तसेच जियोफोन प्लॅनचा समावेश आहे. एअरटेल आणि वोडाफोनच्या दरवाढीनंतर रिलायन्स जियोनेही आपल्या प्लॅनच्या किमतीत सुमारे २० ते २५ टक्के वाढ जाहीर केली आहे.
जियो रिचार्ज प्लॅनमधील आधीचे आणि नवे दर
७५ रु – ९१ रु
- जियोफोनच्या ७५ रुपयांच्या प्लॅनसाठी नव्या दरांनुसार ग्राहकांना ९१ रुपये द्यावे लागतील.
- या प्लॅनमध्ये ३ जीबी डेटासोबत, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि ५० एसएमएस सुविधा आहे.
- हा प्लॅन२८ दिवसांसाठी वैध आहे.
१२९ रु. – १५५ रु.
- जियोच्या १२९ रुपयांच्या अमर्यादित प्लॅनचा टॅरिफ प्लॅन आता १५५ रुपयांना मिळणार आहे.
- या प्लॅनमध्ये मासिक डेटासह अनलिमिटेड कॉलिंगसह ३०० एसएमएस दिले जात आहेत.
- हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध आहे.
२३९९ रु. – २७७९ रु.
- जियोने आपल्या वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये ४८० रुपयांची वाढ केली आहे.
- ग्राहकांना जियोच्या २३९९ रुपयांच्या प्लॅनसाठी २८७९ रुपये खर्च करावे लागतील.
- या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग तसेच दररोज १०० एसएमएस सुविधा आहे.
१४९ रु. – १७९ रु.
- दररोज १ जीबी डेटासाठी ग्राहकांना किमान १४९ रुपयांऐवजी १७९ रुपये खर्च करावे लागतील. हा प्लॅन २४ दिवसांसाठी वैध आहे.
- या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस सुविधा आहे.
२४९ रु – २९९ रु.
- जियो ग्राहकांना दररोज २ जीबी डेटासाठी २४९ रुपयांऐवजी २९९ रुपये खर्च करावे लागतील.
- या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटासह, अमर्यादित कॉलिंग तसेच दररोज २०० एसएमएस सुविधा आहे.
डेटा अॅड-ऑन प्लॅनच्या किमतीतही वाढ!
- जियोचा ५१ रुपयांचा डेटा अॅड-ऑन प्लॅन ६१ रुपयांमध्ये येईल.
- या प्लॅनमध्ये ६ जीबी डेटा देण्यात आला आहे.
- १०१ रुपयांचा तोच डेटा अॅड-ऑन प्लॅन १२१ रुपयांना मिळेल.
- या प्लॅनमध्ये १२ जीबी डेटा दिला जात आहे.
- जियोचा ५० जीबी डेटा प्लॅन ३०१ रुपयांचा झाला आहे, जो पूर्वी २५१ रुपयांना मिळत होता.