Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

TETपेक्षाही मोठा शिक्षक भरती घोटाळा : कोट्यवधीची उलाढाल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
teachers recruitment

हेरंब कुलकर्णी

सध्या TET शिक्षक घोटाळा गाजतो आहे.पण यापेक्षाही एक मोठा शिक्षकभरती घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे पण दुर्दैवाने त्याची चर्चा झाली नाही. TET पास नसलेले हजारो शिक्षक सेवेत घेण्यात आले आहेत हे आपण बघतोय. TET ची अट २०१३साली लागू झाली व २०१३ साली शिक्षकभरती बंद झाली. यातून पळवाट काढत हे शिक्षक २०१२ पूर्वी आमच्या शाळेत काम करत होते,असे रेकॉर्ड तयार करून अधिकाऱ्यांना पैसे देऊन शिक्षकांना मान्यता मिळवल्या व ते हजारो शिक्षक आज सेवेत रुजू केले आहेत व असे प्रत्येक जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त शिक्षक आहेत.

 

या घोटाळ्याची पद्धत अशी की शिक्षकांच्या सह्या असलेले हजेरीपुस्तक २०१२ पूर्वीपासून दाखवायचे आणि ते शिक्षक २०१२ पासून नोकरीत होते त्यामुळे ते शिक्षक भरतीपूर्वी कामाला होते असे रेकॉर्ड तयार करायचे.त्याला शिक्षणाधिकारी मान्यता मिळवली.याला मंत्रालय स्तरावरून मान्यता दिल्या गेल्या व हे शिक्षक ९ वी व १०वीला शिकवत होते असे दाखवून TET तुन सूट मिळवून घेतली(TET ८वी पर्यंत असते).म्हणजे TET पास होण्याचीही किंमत वसूल केली व TET लागू नसण्याचेही पैसे वसूल करण्यात आले..त्यानंतर या शिक्षकांना शालार्थ आय डी देण्यासाठी स्वतंत्र पैसे घेतले गेले आणि पगार सुरू करण्यासाठी पैसे घेतले.त्यानंतर त्यांच्या पूर्वीपासून नोकरीत जाते म्हणून लाखो रुपयांचा पगाराचा फरकही काढण्यात आले व त्यातही अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली.

 

गरीब कुटुंबातील अनेक तरुण शिक्षक यात भरडले गेले असून त्यांना जिल्हा शिक्षणाधिकारी ते मंत्रालय असा किमान १५ लाखापर्यंत खर्च आला आहे. शिक्षण संस्थेने घेतलेले पैसे पुन्हा वेगळेच.जवळपास२० ते २५ लाख रुपये देऊन या नोकऱ्या मिळाल्या आहेत. यातील अनेक शिक्षकांनी कर्ज काढले आहे. ते कर्जबाजारी झाले आहेत. हा घोटाळा इतका व्यापक आहे की प्रत्येक जिल्ह्यात ही संख्या किमान ५०० ते १००० असावी असा अंदाज आहे. इतके शिक्षक गुणिले किमान १० लाख धरले तरी या घोटाळ्याचा अंदाज येईल..हा घोटाळा TET लाही मागे टाकू शकेल…

 

हा घोटाळा उघड करण्याचा सोपा मार्ग म्हणजे २०१२ नंतर शिक्षक भरती बंद असताना २०१२ नंतर जिल्ह्यात नवे शिक्षक किती भरती झाले ही संख्या घेतली की हा घोटाळा उघड होतो. त्याकाळात अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असताना व शिक्षकभरती बंद असताना ही शिक्षकभरती झाली कशी ?

  • TET पास नसताना हे शिक्षक या व्यवस्थेत कसे आले ? हा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारायला हवा.
    आज साने गुरुजी जयंती आहे
  • महाराष्ट्रातील नवीन शिक्षक भरतीचे हे वास्तव आहे.
  • इतके लाख रुपये देऊन सेवेत आलेले शिक्षक कसे स्वप्नाळू राहतील…??

 

Heramb Kulkarni Author Education Expert

(हेरंब कुलकर्णी हे शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात अनाथ झालेली मुलं, वैधव्य आलेल्या महिलांसाठीही ते कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक म्हणून सातत्यानं कार्यरत आहेत.)


Tags: Herambh kulkarniteachers recruitmentशिक्षक भरतीहेरंब कुलकर्णी
Previous Post

डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रेरणादायी ‘प्रकाशवाटा’ ऐका स्टोरीटेलवर!

Next Post

“अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल” – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
Inauguration Ceremony of Maharashtra State Teachers Development Institute

"अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल" - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!