मुक्तपीठ टीम
शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि कार्यकर्ते असणारे हेरंब कुलकर्णी यांनी कोरोना काळात शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रम राबविले आहे.
मुक्तपीठ उपक्रमातही लेखन आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून ते सक्रिय असतात.
हेरंब कुलकर्णी हे समाजातील दुर्लक्षित घटकांच्या समस्या थेट जाणून घेतात, अनुभवतात आणि सोप्या शब्दांमध्ये मांडतात. त्याबरोबरच त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व काव्यक्षेत्रातही प्रसिद्ध आहे. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात शिक्षक व विद्यार्थी व पालक यांना उपयुक्त ठरतील असे ११ महिन्यात १२५ व्हिडीओ तयार केले व युट्यूब वर अपलोड केले. त्यात ८० मुलाखती, ३१ पुस्तक परिचय व विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवर १४ व्याख्यानांचा समावेश आहे.
१ मे २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात शिक्षक व शिक्षण अभ्यासक यांच्या मुलाखती, मराठी माध्यमातून शिकून इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलेल्या व्यक्तींशी इंग्लिश गप्पा, रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती कार्यरत व उपेक्षितांचे जग दाखवणारी पुस्तके व शिक्षणविषयक पुस्तकांचा परिचय व विविध विषयांवर व्याख्याने असे १२५ व्हिडीओ केले आहेत.
लॉकडाऊन काळात केलेले उपक्रम:
- शिक्षणगप्पा (४३मुलाखती)
- इंग्लिश गप्पा (१३ मुलाखती)
- कार्यरत (२४ मुलाखती)
- उपेक्षितांविषयीचे पुस्तक परिचय (२१ व्हिडीओ)
- शिक्षणविषयक पुस्तक परिचय (१० व्हिडीओ)
- विविध विषयांवर व्याख्याने (१४ व्हिडीओ)
त्यांच्या युट्यूब चॅनलवर सर्व व्हिडीओ उपलब्ध आहेत. आपण ते पाहावेत, असे त्यांचे आवाहन आहे. यापुढेही हा उपक्रम असाच सुरू राहील.
लॉकडाऊनच्या काळात शिक्षक व विद्यार्थी समूहाला उपयुक्त ठरावेत. या भावनेने हा उपक्रम केला. यातून दुर्गम ठिकाणी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते व उपक्रमशील शिक्षक यांचे डॉक्युमेंटेशन करता आले. त्याचप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक पुस्तके यांचा परिचय करून देता आला याबद्दल ते समाधान व्यक्त करतात.
व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या चॅनलवर क्लिक करा
(हेरंबकुलकर्णी। ८२०८५८९१९५)