Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाळा उघडणे हा जनभावनेच्या दडपणाने घ्यावा लागलेला निर्णय!

January 20, 2022
in featured, घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
heramb kulkarni on reopening of schools

हेरंब कुलकर्णी

शाळा उघडण्याचा हा घेतलेला निर्णय  हा जनभावनेचा आदर करणारा आहे. त्यामुळे स्वागतार्ह आहे. शाळा बंद केल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधी पालकांनी जो आक्रोश केला. त्यातून ग्रामीण महाराष्ट्राला शाळा उघडायला हव्या आहेत अशीच भावना थेटपणे व्यक्त झाली. त्या दडपणातून सरकार आज शाळा उघडत आहे हे लक्षात घ्यायला हवे.आमच्या आवाहनानुसार पालकांनी प्रथमच एकत्र येऊन ठिकठिकाणी निवेदने दिली हे खूप प्रातिनिधिक चित्र होते.
आश्रमशाळा व वसतिगृह ही तातडीने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा कारण आश्रमशाळा आणि वसतिगृह बंद असल्यामुळे आदिवासी भटके-विमुक्त विद्यार्थी शिक्षणापासून पूर्ण वंचित राहत आहेत व त्यांना ऑनलाईन ची कुठलीही सुविधा नाही.

 

लहान मुलांवर शिक्षणाचा प्रयोग करताना खरे तर महाविद्यालय अगोदर उघडायला हवीत परंतु प्रत्येक वेळी त्या बाबतीत चालढकल दिसून आली आहे.

 

यानिमित्ताने शहरी भागाच्या आधारे निर्णय घेऊन ते संपूर्ण महाराष्ट्रावर लादले जातात हा मुद्दाही पुढे आला आहे.
शहरी भागातील कोरोनाचा संसर्ग, तेथील मुलांच्या वाहतुकीची समस्या हा पूर्ण वेगळा मुद्दा असताना त्याच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील शाळा बंद करणे हे अत्यंत चुकीचे व हास्यास्पद होते. त्यामुळे इथून पुढे कोणतेही निर्णय घेताना शहरी व ग्रामीण असा विचार करून घ्यायला हवेत व स्थानिक प्रशासनालाच त्याचे अधिकार असले पाहिजे असे यानिमित्ताने मांडावेसे वाटते.

 

Heramb Kulkarni Author Education Expert

(हेरंब कुलकर्णी हे शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात अनाथ झालेली मुलं, वैधव्य आलेल्या महिलांसाठीही ते कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक म्हणून सातत्यानं कार्यरत आहेत.)


Tags: Heramb KulkarniSchool reopeningUddhav Thackerayvarsha gaikwadहेरंब कुलकर्णी
Previous Post

सावधान! आताची लढाई अधिक अवघड बनलीय!

Next Post

बारा जलसंपदा प्रकल्प, क्रीडा संकुलांसाठी निधी वाढीबरोबरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय?

Next Post
cabinet meeting

बारा जलसंपदा प्रकल्प, क्रीडा संकुलांसाठी निधी वाढीबरोबरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!