Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“निमित्त आदिवासी राष्ट्रपतींचं…विदारक आदिवासी जगण्याची ही आकडेवारी जरूर बघा!”

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Indian Tribals

हेरंबकुलकर्णी

भारताच्या राष्ट्रपती आदिवासी महिला झाल्याने सर्वांनाच आनंद होतोय आणि नक्कीच ते कौतुकास्पद आहे. यानिमित्ताने आदिवासी जीवनाची चर्चा सुरू झालीय. या जागरूकतेतून विकासाच्या तळातल्या आदिवासी समूहाचे जीवनमान उंचावणारा कृतीकार्यक्रम सर्व सरकारांनी अंमलात आणला तर ही राष्ट्रपती निवड यथार्थ होईल…

यासाठी आदिवासी जीवनाची काही विदारक आकडेवारी एकत्र करून मांडतो आहे…

  • संयुक्त राष्ट्रच्या जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांक (२०२१) नुसार भारतातील ५०.६ टक्के आदिवासी सर्वात गरीब स्थितीत असल्याचे आढळले आहे.
  • २०११ च्या जनगणनेत आदिवासी लोकसंख्या ही १०.४३ कोटी असून एकूण लोकसंख्येत हे प्रमाण ८.६ टक्के आहे
  • एकूण साक्षरतेचे प्रमाण आदिवासी जमातीत मध्ये ६३.१ टक्के असून त्यात महिला साक्षरतेचे प्रमाण हे ५४.४ टक्के आहे.
  • मजुरीवर गुजराण करणारी कुटुंबे ५१.३६ टक्के असून
  • भूमिहीन असलेल्या कुटुंबाची संख्या २९.८४ टक्के आहे. स्वयंचलित गाडी असण्याची संख्या १० टक्के आहे.

शिक्षण

२०११च्या भारत सरकारच्या आकडेवारी नुसार आदिवासी भागातील शिक्षणातून मुलींच्या गळतीचे प्रमाण

  • १ली ते ५ वी ३३.१ टक्के
  • १ ली ते ८वी ५५.४ टक्के
  • १ ली ते १० वी ७१.३ टक्के
  • इतके मोठे होते हे प्रमाण काहीसे कमी झाले आहे तरीही अलीकडच्या आकडेवारी नुसार

९वी १० वी च्या मुलांची व मुलींची आदिवासी कुटुंबातील गळती सर्वात चिंताजनक आहे.

U-dise च्या अलीकडच्या अहवालानुसार ९वी १० वी ला गळती होण्याचे प्रमाण आदिवासी जिल्ह्यात

  • ओरिसा ३१.५ टक्के
  • मध्यप्रदेश ३०.९ टक्के
  • महाराष्ट्र २६ टक्के
  • आसाम ३० टक्के
  • झारखंड २४ टक्के
  • छत्तीसगड २० टक्के

(भारताची सरासरी २४ टक्के असून सर्वसाधारण गटाची सरासरी ११ टक्के आहे)

गेल्या ३ वर्षात महाराष्ट्रात फक्त आदिवासी जिल्ह्यात १५००० बालविवाह झाल्याचे महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.
ही जर महाराष्ट्राची स्थिती असेल तर देशातील इतर मागास राज्यातील आदिवासी भागात किती बालविवाह होत असतील…?

NFHS – 4 नुसार कुपोषणाचे प्रमाण ४३ टक्के आहे

  • महाराष्ट्रात २०१९ ते २२ या काळात १६ आदिवासी जिल्ह्यात कुपोषणाने ६५८२ मुलांचे मृत्यू झाले.
  • त्यातील ६०१ मातांचे बालविवाह झाल्याचे आढळून आले

आदिवासी महिला ऍनेमिक असण्याचे प्रमाण ५९.९ आहे

  • भारतात दरवर्षी ५६००० मातामृत्यू होतात. बालविवाह होत असल्याचे प्रमाण आदिवासी महिलांमध्ये जास्त असल्याने या मातामृत्युत या महिलांची संख्या लक्षणीय असते

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (NCRB)च्या आकडेवारी नुसार देशातील अनुसूचित जाती व जमातीवर होत असलेल्या अत्याचाराच्या २०१९-२० मध्ये ४५९६१ तक्रारी नोंदवल्या तर २०२०-२०२१ मध्ये एकूण ५०,२९१ तक्रारी नोंदवल्या गेल्या.
२०२०- २०२१ मध्ये फक्त आदिवासींवर झालेल्या अत्याचाराच्या एकूण ८२७२ तक्रारी नोंदवण्यात आल्या.त्यात मध्यप्रदेश व राजस्थान मध्येच त्यातील ५३टक्के तक्रारी आहेत. या समूहाचे जगणे राष्ट्रीय प्राधान्याचा विषय व्हायला हवा. आदिवासी महिला राष्ट्रपतींच्या निमित्ताने हे वास्तव आपण सारे बदलू या…

Heramb Kulkarni Author Education Expert

हेरंब कुलकर्णी
8208589195

(हेरंब कुलकर्णी हे शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात अनाथ झालेली मुलं, वैधव्य आलेल्या महिलांसाठीही ते कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक म्हणून सातत्यानं कार्यरत आहेत.)


Tags: Heramb KulkarniIndian TribalsPresident Draupadi MurmuTribal CommunityTribalsvha abhivyaktaआदिवासी समूहहेरंब कुलकर्णी
Previous Post

मुंबईत एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदी

Next Post

होय,खरंच आपल्याला आपलीच लाज वाटेल!

Next Post
raja mane on a youngster's fight after tragedy

होय,खरंच आपल्याला आपलीच लाज वाटेल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!