Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#व्हाअभिव्यक्त! मोदींभोवती मोदींविरोधक का बरे फिरत आहेत ?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narendra modi

हेरंब कुलकर्णी

बांगलादेशमध्ये मोदींनी जे विधान केले त्याच्यावर सोशल मीडियात अक्षरशः प्रतिभेला बहर आला आहे. शेकडो विनोद आणि पोस्ट सारख्या पडत आहेत आणि त्यातील उपहासही अतिशय उंचीचा आहे. या निमित्ताने एक मुद्दा लक्षात येतो आपल्या सगळ्या चाहते आणि विरोधकांना आपल्या भोवती फिरवत ठेवण्यात ते यशस्वी ठरत आहेत. मागील वर्षी टाळ्या वाजवा,नंतर दिवे लावा भोवती ही विरोधक असेच गोल गोल फिरले आणि सातत्याने त्यांच्या प्रत्येक कृतीला खूप महत्त्व देऊन त्यांना प्रकाशझोतात ठेवण्याचे काम मोदी विरोधकच जास्त करत आहेत का ? असे वाटू लागते. त्यांनी वाढवलेली दाढी, रवींद्रनाथ टागोर यांची वेशभूषा, लस घेताना खांद्यावर आसामचा पंचा, या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी वर सोशल मीडिया फिरतो आहे आणि त्यात भक्तांपेक्षा विरोधक जास्त पुढे आहेत…

 

मुख्य मुद्दा हा आहे की त्यांना पर्याय देण्यापेक्षा आपण त्यांच्या दोष दिग्दर्शनातच जास्त वेळ घालवतो आहे असे वाटत नाही का ? ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्याला पर्याय म्हणून आपण जी विचारधारा म्हणतो त्या विचार धारेची रेघ मोठी व्हावी अशा पोस्ट, अशा प्रकारचे आपले काम सतत पुढे यायला नको का ? आपण फक्त प्रतिक्रियावादी झालो आहोत का ? त्यांनी अजेंडा सेट करायचा व आपण त्या अजेंड्यावर टीकेची झोड उठवून त्या अजेंड्यावर चर्चा घडेल या सापळ्यात अडकायचे ? असेच सुरू आहे. त्यातही त्यांच्या झालेल्या गंभीर चुका त्याचे सामाजिक राजकीय परिणाम होतील अशावर नक्कीच तुटून पडले पाहिजे परंतु दाढी, पंचा केलेली विधाने, टाळ्या वाजवा, दिवे लावा या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले तर असा काय फरक पडणार आहे ? आपण का फिरत राहतो आहोत ? याचा विचार करायला हवा.

असे म्हटल्यावर काहीजण तुम्हाला त्यांच्यावरची टीका दुसरीकडे वळवायची आहे असाही अर्थ काढतील परंतु आपण पर्यायावर कमी बोलतो आहोत व nonissue वर टीका करून त्यांचे चिंतन जास्त करतो आहोत हे वास्तव तरी मान्य आहे की नाही ? राजकारण समाजकारणात तुम्ही समोरच्याची उपेक्षाही करायची असते अन्यथा तुम्ही नकळत त्याचेच प्रचारक होता… गोळवळकर गुरुजी यांना एकदा विचारले होते की तुमचे सर्वात मोठे प्रचारक कोण ? तेव्हा ते म्हणाले की पंडित नेहरू व काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते कारण ते हजारो-लाखोंच्या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करतात व नंतर आम्ही त्या गावांमध्ये गेल्यावर आमचे काम सोपे होते कारण लोकांना तो शब्द परिचित झालेला असतो…

 

तेव्हा आपण यापासून बोध घेऊन आपल्याला जो विचार मांडण्यासाठी काम करायला हवे. त्या विचारसरणीच्या आधारे जनतेचे प्रश्न मोठ्या आवाजात मांडायला हवेत. ते प्रश्न जर आपण मोठे करू शकलो तरच हा विचार लहान होऊ शकेल अन्यथा ते रोज काहीतरी करणार आहेत आणि आपण रोज पोस्ट टाकणार आहोत… पण या लाईक आणि कमेंट ने सत्ता बदलत नसते हे लक्षात घ्यायला हवे, सत्ता फक्त मतपेटीतून बदलते।

heramb kulkarni

(शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि कार्यकर्ते असणारे हेरंब कुलकर्णी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या समस्या थेट जाणून घेतात, अनुभवतात आणि सोप्या शब्दांमध्ये मांडतात. त्याबरोबरच त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व काव्यक्षेत्रातही प्रसिद्ध आहे.  संपर्क – ८२०८५८९१९५ )

 


Tags: Heramb KulkarniVha Abhivyaktनरेंद्र मोदीहेरंब कुलकर्णी
Previous Post

आता पुण्यात होणार डॉ. शीतल आमटेंच्या मृत्यूचा तपास

Next Post

‘कोरोना निवडणूक गर्दी होणाऱ्या राज्यांमध्ये निष्प्रभ! महाराष्ट्रातच का धुमाकूळ?”

Next Post
aslam shaikh

'कोरोना निवडणूक गर्दी होणाऱ्या राज्यांमध्ये निष्प्रभ! महाराष्ट्रातच का धुमाकूळ?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!