Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवा मोटर वाहन कायदा…मोटर सायकलवर नऊ महिन्यांवरील मुलांनाही हॅल्मेट बंधनकारक! सेफ्टी बेल्टही पाहिजेच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bike (2)

मुक्तपीठ टीम

लहान मुलांसोबत मोटर सायकलवरुन प्रवास करताय? तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. लहान मुलांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत. मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ मध्ये सुधारणा करण्यात आली असून आता ही सुधारणा मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९ च्या संदर्भात आहे. या कलमानूसार आता मोटरसायकलस्वाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याच्या मागे बसलेल्या ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलांनी त्यांच्या डोक्याच्या साईजचे क्रॅश हेल्मेट घालावे. एवढेच नाही तर चार वर्षापर्यंतचे मूल मोटारसायकलवर बसत असताना, मोटरसायकलची वेगमर्यादाही ताशी ४० किलोमीटरपेक्षा जास्त नसावी. या नियमांचे उल्लंघन केल्यास या नियमांचं उल्लंघन केल्यास पोलीस दंडही आकारु शकतात.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विविध रस्ते सुरक्षा संघटनांच्या सूचनांवरून मोटार वाहन कायद्यातील हा दुरुस्तीचा मसुदा स्वीकारत या संदर्भातील दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रोड सेफ्टी ऑर्गनायझेशनचे डेप्युटी हेड एसके शर्मा सांगतात की, ही तरतूद मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे.

 

मोटारसायकलचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा जास्त नसावा

  • याशिवाय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेही दुचाकीवरील मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन एक प्रस्ताव तयार केला आहे.
  • या अंतर्गत जर चार वर्षांपर्यंतचा मुलगा मोटारसायकलवर मागे बसला असेल तर मोटारसायकलचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा जास्त नसावा.
  • प्रस्तावात असे म्हटले आहे की ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलाने मागे बसल्यास क्रॅश हेल्मेट घालणे आवश्यक आहे.
  • एवढेच नाही तर चार वर्षांखालील मुलाला मोटारसायकलच्या चालकाशी जोडण्यासाठी सुरक्षा हार्नेस वापरावा लागेल.
  • सेफ्टी हार्नेसच्या मदतीने मुलाचे वरचे धड ड्रायव्हरला सुरक्षितपणे जोडले जाईल.

 

कसं असावं हेल्मेट?

  • सेफ्टी हार्नेसबाबत, असे म्हटले आहे की, ते हेल्मेट बीआयएसच्या सर्व नियमांनुसार असावे.
  • वजनाने हलके आणि अॅडजस्टेबल असायला हवे.
  • ते वॉटरप्रूफ आणि टिकाऊ देखील असायलाच हवे.
  • संरक्षक उपकरणे हेवी नायलॉन किंवा मल्टीफिलामेंट नायलॉनपासून बनवलेली असावीत ज्यामध्ये मजबूत फोम असेल.
  • सुरक्षा उपकरण इतकं मजबूत असावं की, ३० किलोपर्यंतचं वजन सहज सहन करु शकेल.

Tags: MotorcycleNitin GadkariS.K.Sharmaएसके शर्मानितीन गडकरीमोटर सायकलहॅल्मेट
Previous Post

अनुराधा पौडवाल : नव्वदचं दशक गाजवणारी प्रेमगीतं ते भक्तिरसातील तन्मयता…समाजासाठीही समर्पण!

Next Post

वैचारिक दिवाळीची नवीन पहाट,  ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे युगपरिवर्तक नाटक ‘लोक-शास्त्र सावित्री’  

Next Post
सावित्रीबाई फुले नाट्यगृहात

वैचारिक दिवाळीची नवीन पहाट,  'थिएटर ऑफ रेलेवन्स'चे युगपरिवर्तक नाटक 'लोक-शास्त्र सावित्री'  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!