मुक्तपीठ टीम
भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर धोक्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार गोवा आणि कोकणातील तुरळक ठिकाणी आज वीजा आणि ३० ते ४० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा), काही ठिकाणी १८ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचाही इशारा आहे.
हवामान खात्याकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला. तो पुढीलप्रमाणे
- १५ मे: गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह (३०-४० किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता.
- गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
- १६ मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा), मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह (३०-४० किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता.
- गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ५०-६० किमी प्रतितास ते ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
- १७ मे: गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
- १८ मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.
- अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ४०-५० प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
- अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असणण्याची शक्यता.