मुक्तपीठ टीम
हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका मुंबईला सकाळच्या गर्दीच्या वेळीच बसताना दिसत आहे. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्यांप्रमाणेच रेल्वे मार्गावरही पाणी साचल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लाइफलाइनवरही दिसू लागला आहे.
सखल भागात पाणी साचले, वाहतुकीवर परिणाम
• मध्य मुंबईतील शीव, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी दर पावसाळ्याप्रमाणेच पाणी साचले आहे.
• मुबंईच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.
• या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
• या भागातील पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्यासाठी मोठ्या भूमिगत टाक्यांचे काम सुरु आहे.
• अद्याप ते काम पूर्ण झालेले नसल्याने त्याचा आज तरी उपयोग झालेला दिसत नाही.
मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम
• रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार कुर्ला-सायन भागात पाणी रेल्वे रुळावर पाणी आल्याने रेल्वे धीम्या गतीने चालवली जात आहे.
• कदाचित पाणी आणखी वाढले तर रेल्वे वाहतूक बंद केली जाण्याची शक्यता आहे.
समुद्रालाही मोठी भरती
• आज मोठ्या भरतीची वेळ ११ वाजून ५० मिनिटांची आहे.
• पाऊस असाच सुरु राहिला तर मुंबईतील पाण्याचा निचरा अवघड होईल.
• त्यामुळे नेहमीचे सखल भाग आणि कोस्टल रोड, मेट्रो कामे सुरु असलेल्या ठिकाणी पाणी साचू शकेल.
हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा
• मुंबई शहर आणि उपनगराच्या परिसरात मोठा पाऊस सुरु आहे.
• हवामान खात्याने ९ ते १२ जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
• हे चार दिवस ३०० मिमीपेक्षाही जास्त पावसाचा अंदाज आहे.
• मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा आहे.
• हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.