Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आंध्र, तामिळनाडूत पावसाचा हाहाकार! पाण्यातून वाहत गेले मृतदेह! सबरीमाला मंदिरही बंद!

November 20, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
heavy rain in andhra, tamilnadu

मुक्तपीठ टीम

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण बेपत्ता आहेत. जिल्ह्यातील राजमपेट विभागातील नंदालुरू, मांडवल्ली आणि अकापडू गावात तीन APSRTC बस पुराच्या पाण्यात अडकल्या, असे पोलिसांनी सांगितले. चेयुरू जलाशय फुटल्यामुळे पुराचे पाणी रस्त्यावर भरले, त्यात या बसेस बुडाल्या. तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसामुळे सबरीमाला मंदिरही एक दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील परिस्थिती पाहून पंतप्रधान मोदींनी सीएम वायएस जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली आहे.

 

पाण्यात तरंगते मृतदेह

  • बसमधील काही प्रवासी पुराच्या पाण्यात बुडाल्याचे दिसून आले.
  • गुडालुरू गावात सात मृतदेह, रायवरम गावात तीन आणि मदनपल्ले गावात दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले.
  • हे मृतदेह बसमधील प्रवाशांचे आहेत की जवळच्या गावकऱ्यांचे आहेत, याचा शोध घेण्याचा अधिकारी प्रयत्न करत होते.
  • अग्निशमन दलाच्या जवानांनी इतर दोन बसमधील प्रवाशांची सुटका केली.
  • अजून काही बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

सर्वतोपरी मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

  • मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वायएसआर कडापा जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
  • अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी राज्य सरकार पुढे येईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

मोदींनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली.
  • यावेळी मोदींनी आंध्र प्रदेशातील काही भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थिती लक्षात घेऊन त्यांना सर्व शक्य केंद्रीय मदतीचे आश्वासन दिले.
  • शुक्रवारी आंध्र प्रदेशातील कडपा जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरात किमान तीन जणांचा मृत्यू झाला, तर काही लोक वाहून गेल्याची भीती आहे.
  • एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्याशी बोललो.
  • केंद्रीय सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

 

तामिळनाडूतही पावसाचा कहर

  • तामिळनाडूतही मुसळधार पावसाचा कहर आहे.
  • तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात मुसळधार पावसात घर कोसळून चार मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला.
  • राज्यात संततधार पावसामुळे मोठे नुकसान होत आहे.
  • तामिळनाडूमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय पथक नेमले आहे.
  • आंतर-मंत्रालयीय केंद्रीय पथक राज्यातील पुराचे स्वरूप तपासेल आणि राज्याला अतिरिक्त केंद्रीय मदतीची शिफारस करेल.
  • राजीव शर्मा, संयुक्त सचिव, NATGRID, गृह मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली या संघाचे प्रमुख असतील आणि त्यामध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण, वित्त (खर्च विभाग), जलशक्ती, वीज, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि विभागांचे प्रतिनिधी असतील.

 

सबरीमाला मंदिराची यात्रा स्थगित

  • केरळमध्ये मुसळधार पावसाचा परिणाम आता भाविकांनाही पाहायला मिळणार आहे.
  • पथनामथिट्टा जिल्ह्यातील सबरीमाला टेकडीवरील प्रसिद्ध अय्यप्पा मंदिराची यात्रा मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आली.
  • जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पंबासह प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
  • पथनामथिट्टा जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी हा आदेश जारी केला.

Tags: Andhra PradeshHeavy rainfallSamrimala Templetamilnaduआंध्र प्रदेशतामिळनाडूबंगाल उपसागरमुसळधार पाऊससबरीमाला मंदिर
Previous Post

न्यायालयीन सुनावणीदरम्यान पक्षकार बनियानमध्ये…दहा हजार रुपयांचा दंड!

Next Post

सामाजिक न्याय विभागाचे ८७५ कोटी पळवल्याचा आरोप!

Next Post
Cabinet decision

सामाजिक न्याय विभागाचे ८७५ कोटी पळवल्याचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!