Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खर्चाने सिंधुदुर्गात दोन आरोग्य केंद्रामध्ये अत्याधुनिक हेल्थ केअर किट्स

November 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Guardian Minister Ravindra Chavan

मुक्तपीठ टीम

राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले आहे. त्यांच्या खर्चाने सिंधुदुर्गात दोन आरोग्य केंद्रामध्ये अत्याधुनिक हेल्थ केअर किट्स देण्यात आली आहेत.

पालकमंत्री चव्हाण हे स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” उपलब्ध करुन देणार आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून प्रत्येकी दोन आरोग्य केंद्रामध्ये हे अत्याधुनिक हेल्थ केअर किट्स उपलब्ध होणार आहेत. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज कुडाळ येथील माणगावं प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झाले. तसेच ५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजता सावंतवाडी मधील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सुविधा केंद्र येथे होणार आहे.

सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड येथे टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील गरजू जनतेला वैद्यकीय चाचण्यांची सुविधा मोफत व तात्काळ उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरुन गरजू रुग्णांना मिळणारे उपचार अधिक जलदगतीने होण्यास त्याची मदत होईल असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक सीईओ समीर सावरकर व संस्थापक सीओओ राजीव कुमार असून दोघेही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरचे माजी विद्यार्थी आहेत. श्री समीर हे अशोका फेलो देखील आहेत. न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही ISO13485-2016 आणि CE प्रमाणित, वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित उत्पादनांसह स्वदेशी वैद्यकीय उपकरणे तयार करणारी डिजिटल हेल्थकेअर कंपनी असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (DSIR) मान्यताप्राप्त अशी न्यूरोसिनॅप्टिकची R&D लॅब आहे. कंपनीने “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” हे उपकरण तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) आणि भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग ( BIRAC ) ह्यांच्या सहकार्याने आविष्कृत केले आहे. विशेष म्हणजे कंपनीने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्णतः भारतीय तंत्रज्ञान वापरून “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” विकसित केले आहे.

न्यूरोसिनॅप्टीक गेली अनेक वर्षे ई-हेल्थ व एम-हेल्थ टेक्नोलॉजी सोल्युशन्स या क्षेत्रात काम करत आहे. सामाजिक जबाबदारीचे भान राखून खाजगी रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तसेच परदेशातही टेलिमेडिसिनच्या माध्यमातून कंपनी तर्फे याच प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” हे भारतातील विविध राज्यांमध्ये उपलब्ध असून आजतागायत देशभरातील सुमारे २७०० ग्रामीण केंद्रात सदर सुविधा स्थापन करुन दिलेली आहे.

न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्सला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मान्यता प्राप्त आहेत ज्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मचा “टेक्नॉलॉजी पायोनियर”, नॅसकॉम फाउंडेशनचा “ज्यूरीज स्पेशल चॉईस” आणि नुकताच मिळालेला ” रेड हॅरींग ग्लोबल टॉप १०० कंपनीज” असे प्रतिष्ठित पुरस्कार समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे ह्या क्षेत्रातील न्यूरोसिनॅप्टीक ही एकमेव भारतीय कंपनी आहे जीचा गौरव “टाईम मॅगझिन”ने केला आहे.

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम ह्यांनी उदघाटन करून राष्ट्राला समर्पित केलेले हे “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” आता महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अतिशय सोयीचे आणि लाभदायक ठरणार आहे असे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

 


Tags: Arogya KendraFree medical check-up facilitygood newsGuardian Minister Ravindra ChavanHealth Care KitsmuktpeethSindhudurgआरोग्य केंद्रघडलं-बिघडलंचांगली बातमीपालकमंत्री रविंद्र चव्हाणमुक्तपीठवैद्यकीय तपासणी मोफत सुविधासिंधुदुर्गहेल्थ केअर किट्स
Previous Post

सरस फूड फेस्टीवलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती

Next Post

भाडेकरुंचा तपशील ऑनलाईन पोर्टलवर कळविण्याचे आवाहन

Next Post
Mumbai Police Commissioner's Office

भाडेकरुंचा तपशील ऑनलाईन पोर्टलवर कळविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!