मुक्तपीठ टीम
फळांचा राजा म्हणून ओळखला आंबा सर्वांच्याच आवडीचा. उन्हाळा आला की, लोक आतूर होतात ते आंबे खाण्यासाठी. उन्हाळ्याचा सिजन हा आंब्यांचा असं म्हटलं तरी चालेल. आंबा फक्त खाण्यासाठीच स्वादिष्ट नाही तर उष्णतेपासून आराम देण्यासही मदत करतो. स्मूदी, शेकपासून ते साध्या स्लाइसपर्यंत, लोकांना अनेक प्रकारात आंबा खायला आवडतो. आंब्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. आंब्यामुळे वजन वाढतं असं अनेकांचं मत आहे, पण त्यावरही उपाय आहे.
आंब्याचे सेवन केल्याने शरीराला होणारे फायदे
१. कर्करोगाचा धोका कमी करते
- आंब्यामध्ये बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, जे अँटिऑक्सिडेंट असते.
- आंब्यामध्ये असलेले हे अँटिऑक्सिडंट्स कर्करोगास कारणीभूत असलेल्या पेशींशी लढा देतात.
२. स्वच्छ, निरोगी त्वचेसाठी फायदेशीर
- आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी त्वचेला अनुकूल आणि त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत.
- आंब्याच्या सेवनाने त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. त्वचेतील तेल कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.
३. वजन कमी करण्यास मदत होते
- अति केलं तर काहीही वाईटच. तसंच आंब्याचंही. पण माफक प्रमाणात आंबा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
- आंब्यात फायटोकेमिकल्स असतात जे फॅट बर्न करतात.
- आंब्यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ, स्नॅक्स यावरील तुमचे अवलंबित्व कमी होते.
४. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
- आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, तांबे, फोलेट, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्ससह विविध बी जीवनसत्त्वे असतात, जे शरीराची
- संपूर्ण प्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि मजबूत करण्यास मदत करतात.
५. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते
- आंबा फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते.
- हे पोषक द्रव्ये हृदयविकाराचा धोका कमी करताना धमन्या खुल्या ठेवण्यास मदत करतात.