Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्याला प्रश्न: “मोदी नको, मग नेहरू कसे चालतात?”

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोला आक्षेप!

December 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
pm modi

मुक्तपीठ टीम

कोरोनाविरुद्ध लसीकरण केल्यानंतर आपल्या सर्वांना प्रमाणपत्र दिलं जातं. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोंदीचा फोटोही आहे. याच फोटोवर आक्षेप घेत खासगी रुग्णालयात पैसे भरून लसीकरण घेणाऱ्या एका माहिती अधिकाऱ्याने केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असण्यावर काय अडचण आहे? तुम्ही जवाहरलाल नेहरू नावाच्या संस्थेत काम करता. ते देखील पंतप्रधान होते. तुम्ही विद्यापीठाला त्यांचं नाव काढून टाकण्याची मागणी का करत नाही?” असा प्रश्न करत चांगलेच सुनावले.

 

लस प्रमाणपत्र ही माझी खाजगी मालमत्ता आहे. त्यावर माझे काही अधिकार आहेत. मी लसीकरणासाठी पैसे दिले असून त्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो लावून पंतप्रधानांचे श्रेय घेण्याचा सरकारला अधिकार नाही, असे याचिकाकर्त्याने सांगितले.

 

“इतर देशांना त्यांच्या पंतप्रधानावर अभिमान नसेल म्हणून त्यांनी लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो लावला नाही. आपल्याला पंतप्रधानांवर अभिमान आहे. लोकांनी जनादेश दिल्यामुळे ते देशाचे पंतप्रधान बनले आहेत. आपले राजकीय मतभेद असतील, पण ते तरीही आपले पंतप्रधान आहेत. तुम्हाला तुमच्या पंतप्रधानाची लाज का वाटते? १०० कोटी लोकांना काही अडचण नाही, मग तुम्हालाच का?” असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला.

 

इतर देशांमध्ये जी लस प्रमाणपत्रे दिली जातात त्यावर त्यांच्या पंतप्रधानांचा फोटो नाही यावर न्यायाधीशांनी सांगितले की, त्यांना आपल्या पंतप्रधानांचा अभिमान वाटणार नाही. आम्हाला आमच्या पंतप्रधानांचा अभिमान आहे. तुमच्या लसीकरण प्रमाणपत्रावर तुमच्या पंतप्रधानांचे फोटो आहे याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे.

 

मला अभिमान आहे की नाही, ही माझी वैयक्तिक निवड आहे, असे याचिकर्त्याने सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाने तुम्ही जवाहरलाल नेहरू लीडरशिप इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथे राज्यस्तरीय मास्टर प्रशिक्षक आहात. तुम्ही पंतप्रधानांच्या नावावर असलेल्या संस्थेत काम करता. ते बदलायला तुम्ही विद्यापीठाला का सांगत नाही? असा प्रश्न केला.

 

मोदींच्या फोटोवर याचिकाकर्त्याच्या आक्षेपाचे कारण

  • प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो लावून जनतेला कोणताही लाभ मिळत नाही.
  • एखाद्याचे प्रमाणपत्र ही त्याची खाजगी मालमत्ता आहे, त्याची माहिती त्यावर नोंदवली जाते. हे प्रचाराचे ठिकाण नाही.
  • असा फोटो मतदाराचे मन बदलू शकतो.
  • फोटो लावून प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्यास भाग पाडले जात आहे.

Tags: jawaharlal nehrukeral high courtPM Narendra modiकेरळ उच्च न्यायालयकोरोनाजवाहरलाल नेहरूपंतप्रधान नरेंद्र मोदीलसीकरण प्रमाणपत्र
Previous Post

चाळीसगाव – धुळे मेमू ट्रेन सेवेचा शुभारंभ

Next Post

विशेष मोहिमेतून ३ हजार ५०० कोटी रुपयांची कर चुकवेगिरी उघड, ४६० कोटी रुपयांची वसुली!

Next Post
Central Goods and Services Tax Bhiwandi Commissionerate

विशेष मोहिमेतून ३ हजार ५०० कोटी रुपयांची कर चुकवेगिरी उघड, ४६० कोटी रुपयांची वसुली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!