Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विशेष मोहिमेतून ३ हजार ५०० कोटी रुपयांची कर चुकवेगिरी उघड, ४६० कोटी रुपयांची वसुली!

बनावट देयक पावत्यांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडीट घेण्याची मोडस ऑपरेंडी

December 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
Central Goods and Services Tax Bhiwandi Commissionerate

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर भिवंडी आयुक्तालयाच्या, कर चुकवेगिरी विरोधी शाखेने, महाराष्ट्रातल्या बनावट आस्थापनांचे जाळे उध्वस्त केले आहे. प्रत्यक्षात मालाचा पुरवठा न करता इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ आणि उपयोग करण्यात या बनावट आस्थापनांचा हात होता. नवी मुंबई, ठाणे आणि पालघर इथे बारापेक्षा जास्त ठिकाणी यासाठी झडती घेण्यात आली.

 

मेसर्स बालाजी स्टीलने, विविध बनावट आस्थापनांद्वारे ६.२३ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडीटचा दावा करत वेगवेगळ्या ग्राहकांकडे तो हस्तांतरित केल्याचे चौकशीत उघड झाले. कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकाला काल १२ डिसेंबर २०२१ ला सीजीएसटी कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत अटक करण्यात आली. त्यांना मुंबईतल्या फोर्ट इथल्या अतिरिक्त मुख्य शहर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. अधिक तपासाअंती, कर चुकवेगिरी करण्यात आलेली रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

कर चुकवेगिरीची प्रकरणे उघडकीला आणण्यात लक्षणीय वाढ

नुकतेच उघडकीला आणलेले हे प्रकरण म्हणजे मुंबई सीजीएसटीने सप्टेंबर २०२१ मध्ये सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी आणि महसुलात वृद्धी होण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. विदाची बारकाईने तपासणी आणि विश्लेषण यावर ही मोहीम आधारलेली आहे. विवरण पत्र दाखल करण्यात आणि आणि इतर बाबींमध्ये, कर चुकवणाऱ्याचा पूर्वेतिहास तपासल्यानंतर स्पॉट प्रोफाईलिंगसाठी विशेष माहिती तंत्रज्ञान टूलचा वापर करण्यात येतो. ३५०० कोटी रुपयांची कर चुकवेगिरी या मोहिमेतून उघडकीला आली असून ४६० कोटी रुपये वसूल झाले आहेत तर ३० जणांना अटक करण्यात आली आहे. प्रामाणिक आणि अनुपालन करणाऱ्या करदात्यांना प्रोत्साहन मिळावे आणि राष्ट्राच्या सेवेप्रती वस्तू आणि सेवा कर संकलन वृद्धिंगत व्हावे या दृष्टीने मुंबई सीजीएसटी आपली मोहीम आणखी तीव्र करणार आहे.


Tags: Central Goods and Services Tax Bhiwandi Commissioneratemumbaiकेंद्रीय वस्तू आणि सेवा कर भिवंडी आयुक्तालयमुंबई
Previous Post

उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्याला प्रश्न: “मोदी नको, मग नेहरू कसे चालतात?”

Next Post

फिल्म्स डिव्हिजन, CFSI, NFDC या चित्रपट संबंधित विभागांची सुत्रे आता एकाच अधिकाऱ्याकडे!

Next Post
one head for films devision, CFSI, NFDC

फिल्म्स डिव्हिजन, CFSI, NFDC या चित्रपट संबंधित विभागांची सुत्रे आता एकाच अधिकाऱ्याकडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!