Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आंदोलक शेतकऱ्यांचा दणका, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची कृषी कायदे समर्थक महापंचायत उधळली!

शेतकऱ्यांच्या संतापाच्या उद्रेकामुळे मुख्यमंत्री खट्टर सभा रद्द

January 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
Cm Khattar Stage destroyed by farmers-1

मुक्तपीठ टीम

केंद्रातील भाजप सरकारच्या कृषि कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांमधील असंतोष वाढतानाच दिसत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना त्या असंतोषाचा नुकताच फटका बसला. पक्षाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री खट्टर हे कृषी कायद्याचे फायदे सांगण्यासाठी हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील कमला गावात सभा घेणार होते. पण सभेपूर्वीच आंदोलक शेतकर्‍यांनी सभास्थानी तोडफोड केली. शेतकऱ्यांचा संतापाविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी महापंचायत रद्द केली.

मुख्यमंत्री खट्टर यांची सभा असलेल्या कमला गावच्या दिशेने निघालेला शेतकरी मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी खूप प्रयत्न केले. पाण्याच्या तोफांचा आणि अश्रूधुराचाही मारा केला. परंतु, आंदोलक शेतकरी बधले नाहीत. त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचून मुख्यमंत्र्यांच्या ‘किसान महापंचायत’ कार्यक्रमात अडथळा आणला.

Cm Khattar Stage destroyed by farmers-3

राष्ट्रीय माध्यमांमधील माहितीनुसार, शेतकरी आंदोलकांनी सभामंचाचे, त्यावरील खुर्च्या, टेबल यांची तोडफोड केली. भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांच्या संतापासाठी भारतीय किसान युनियनचे नेते गुरनामसिंग चारुणी यांना जबाबदार ठरवलं आहे. त्यांच्या सांगण्यावरून शेतकरी असे वागले, असा आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

भारतीय किसान युनियनने भाजपच्या किसान महापंचायतीला विरोध करणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. गेले दीड महिना आंदोलक शेतकरी तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करीत आहेत. त्यांच्यापैकीच काही शेतकरी काळे झेंडे घेऊन आले. त्यांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत कमला गावाजवळ मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला.

Cm Khattar Stage destroyed by farmers-2

 

शेतकरी आंदोलक कार्यक्रमस्थळी पोहोचू नये म्हणून पोलिसांनी गावाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेट्स लावले. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होऊन देणार नाही या मतावर शेतकरी अडले होते. निषेध करणार्‍या शेतकर्‍यांना पोलीस शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले पण त्यांनी कुणाचंही न ऐकता, कुणालाही न जुमानता मंचावर कब्जा केला होता. अखेर तोडफोडीतून व्यक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाविषयी कळताच मुख्यमंत्री खट्टर यांनी कृषी कायदे समर्थक किसान महापंचायत रद्द करावी लागली.

 

 


Tags: BJPBKUFarmer protest 2020khattarकृषी कायदेभाजपभारतीय किसान युनियनमुख्यमंत्री खट्टरशेतकरी आंदोलन
Previous Post

“तुमच्याकडे ईडी आहे, तर आमच्याकडे पोलीस आहेत!”

Next Post

डॉक्टर व्हायचंय? २२ लाख द्या! मुंबईचा भामटा बिहारात जेरबंद!

Next Post
oshiwara police station

डॉक्टर व्हायचंय? २२ लाख द्या! मुंबईचा भामटा बिहारात जेरबंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!