मुक्तपीठ टीम
अखेर गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाचा हात सोडला आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसने चिंतन, मनन करण्यासाठी अलीकडेच राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित शिबिरातही ते सहभागी झाले नव्हते, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच झाले आहे. पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. बरेच दिवस नाराजी व्यक्त करत असलेल्या हार्दिक पटेलांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आता ते हातात भाजपाचं कमळ घेणार की आपचा झाडू, अशी चर्चा सुरु झाली आहे.
काँग्रेसची प्रतिक्रिया
हार्दिक पटेलने आपला राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. हार्दिक पटेलांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेस नेते म्हणाले की, भाजपमध्ये प्रचंड घबराट आहे. ती दुसऱ्या पक्षाच्या लोकांना तोडत आहे.
हार्दिक पटेलांचे ट्विट
हार्दिक पटेलने सोशल मीडियावर राजीनाम्याची माहिती दिली. त्यांनी ट्वीट केले की, “आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.”
हार्दिक पटेलांच्या हातात कमळ की झाडू?
- हात सोडल्यानंतर हार्दिक पटेल आपमध्ये जाणार की काँग्रेसचा हात हाती घेणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
- त्यांना भाजपामध्ये प्रवेश करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर हार्दिक पटेलने हो किंवा नाही असे स्पष्ट उत्तर दिले नाही.
लोक अनेक प्रकारची कामे करतील असे ते म्हणाले होते. - ते म्हणाले की, जेव्हा अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या आणि जो बिडेन जिंकले, तेव्हा मी त्यांचे कौतुक केले होते.
- मी त्यांचे कौतुक केले, कारण त्यांनी ज्या व्यक्तीला उपराष्ट्रपती बनवले ती भारतीय वंशाची आहे.
- जो बिडेन यांचे कौतुक करणे म्हणजे मी त्याच्या पार्टीत जात आहे का?