Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

हार्दिक पंड्या अडचणीत आला! पण त्याचं कोटी-कोटींच्या घड्याळांचं कलेक्शन…पाहाल तर थक्क व्हाल!

November 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
hardik

रोहिणी ठोंबरे

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचे क्रिकेटपटू मायदेशी परतले. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने चौकशी केली असता, त्याच्याकडून ५ कोटी रुपयांची दोन घड्याळे सापडली. हार्दिक पंड्याला या घड्याळ्यांबाबत विचारले असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. पंड्याने याबद्दल स्पष्टीकरण देताना त्याने स्वत:च त्या घडाळ्यांची माहिती सीमाशुल्क विभागाला दिल्याचे सांगितले.

 

हार्दिक पंड्याकडे या घड्याळांचे बिलही नव्हते. यानंतर कस्टम विभागाने हार्दिककडून घड्याळे घेतली. त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२० मध्ये हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्याकडून लक्झरी घड्याळे सापडली होती. त्यानंतर त्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी रोखले. त्यानंतर हे प्रकरण सीमाशुल्क विभागाकडे सोपवण्यात आले होते.

 

हार्दिक पंड्याने मुंबई विमानतळावरील घड्याळ जप्त केल्याच्या वादावर स्पष्टीकरण देत ट्विट केले की

  • जेव्हा तो दुबईहून परत येत होता, तेव्हा त्याने स्वत: जाऊन आपले घड्याळ कस्टम अधिकाऱ्यांना दिले होते.
  • हार्दिकने इतर सर्व आरोप फेटाळून लावले असून आवश्यक कागदपत्रे सीमाशुल्क अधिकार्‍यांना दिल्याचे सांगितले आहे.
  • त्याचवेळी, सोशल मीडियावर दावा केल्यानुसार घड्याळाची किंमत ५ कोटी रुपये नसून १.५ कोटी रुपये असल्याचे त्याने स्पष्ट केले.
  • मी दुबईतून येताना काही वस्तू खरेदी केल्या होत्या. मुंबईत आल्यावर या वस्तूंबाबत मी स्वतः कस्टम अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि सीमाशुल्क भरण्यास तयार झालो.
  • सीमाशुल्क विभागाने सर्व आवश्यक कागदपत्रे मागवली आहेत, जी आम्ही देत आहोत.
  • सीमाशुल्क विभाग सध्या शुल्क मोजत आहे, जे मी भरण्यास तयार आहे. तसेच घड्याळाची किंमत ५ कोटी नाही तर, १.५ कोटी आहे.

 

हार्दिक पंड्याने आपल्या स्पष्टीकरणात पुढे म्हटले आहे की, “मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे, मी सर्व सरकारी यंत्रणांचा आदर करतो. माझ्यावर जे काही आरोप केले जात आहेत, ते कागदपत्र सीमाशुल्क विभागाला देण्यास मी तयार आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे.” रात्री उशिरा मुंबई विमानतळावर हार्दिक पंड्याकडून ५ कोटी रुपयांची दोन घड्याळे जप्त करण्यात आल्याची ही बातमी समोर आली.

 

हार्दिक पंड्याच्या कोटी-कोटींच्या घड्याळांचं कलेक्शन

 

  • पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११- किंमत ५ कोटींपेक्षा जास्त

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११ या घड्याळाच्या डायल भोवती पाचूंनी एम्बेड केलेले आहे. हार्दिक पांड्या नेहमी त्याच्या स्टायलिश घड्याळ्यांच्या कलेक्शनसाठी ओळखला जातो.

 

  • पॅटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम १८ के व्हाईट गोल्ड- किंमत २.७ कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

आयपीएल २०१९ दरम्यान पंड्या पहिल्यांदा पॅटेक फिलिप परिधान केलेला दिसला होता. या ब्रॅंडचे हे घड्याळ खास प्रसंगांसाठी आहे. डायलवर २५५ हिरे जडलेले आहेत आणि १८ के सोन्याच्या डायल प्लेटवर तीन बॅगेट-कट डायमंड मार्कर आहेत.

 

  • पॅटेक फिलिप नॉटिलस ५७१२- किंमत १.६५ कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

एका जबरदस्त फोटोशूटच्या वेळी त्याने हे घड्याळ परिधान केलेले दिसत आहे. या घड्याळाच्या मूळ डायलवर हिरे नाहीत परंतु, त्याच्या कस्टम अॅडिशनमुळे त्याचे मूल्य १.६५ कोटींपर्यंत वाढते.

 

  • रोलेक्स ऑयस्टर पर्पेच्युअल डेटोना कॉस्मोग्राफ- १ कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

रोलेक्स ऑयस्टर पर्पेच्युअल डेटोना कॉस्मोग्राफ १८ के पिवळ्या सोन्याच्या डायलवर तयार केले गेले आहे, ज्यामध्ये ३६ ट्रॅपीझ-कट हिरे आणि २४३ अतिरिक्त डायमंड जडलेले आहेत.

 

  • ऑडेमार्स पिगेट रॉयल ओक सेल्फविंडिंग क्रोनोग्राफ रोझ गोल्ड – किंमत ३८ लाख

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

ऑडेमार्स पिगेट या घड्याळात पिवळ्या सोन्याचे टोन्ड काउंटर आणि ल्युमिनेसेंट कोटिंगसह मार्कर आहेत. घड्याळाचा पट्टा १८ कॅरेट पिवळ्या सोन्याने बनलेले आहे ज्यात एपी फोल्डिंग क्लॅप आहे ज्याची किंमत जवळपास ३८ लाख आहे.


Tags: expensive watchHardik Pandyamuktpeethwatch collectionघड्याळांचं कलेक्शनमुक्तपीठस्मार्ट वॉचहार्दिक पंड्या
Previous Post

एसटी संपावरून पडळकर आक्रमकच, तर अनिल परबांचं संप मागे घेण्याचं आवाहन!

Next Post

केंद्र सरकारचा महाराष्ट्राशी सापत्नभाव! उत्तरप्रदेशात २७, महाराष्ट्रात फक्त २ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता! निधीही तेथे २, ४६७ कोटी तर इथे २६३ कोटी!

Next Post
pm modi and cm thackeray

केंद्र सरकारचा महाराष्ट्राशी सापत्नभाव! उत्तरप्रदेशात २७, महाराष्ट्रात फक्त २ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता! निधीही तेथे २, ४६७ कोटी तर इथे २६३ कोटी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!