Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

संविधान दिंडी खास रिपोर्ट: पंढरीची वाट, संविधानाची भेट!

July 7, 2022
in featured, धर्म
0
Sanvidhan Samta dindhi

हभप शामसुंदर महाराज सोन्नर

२६ जून २०२२

सासवड ते जेजुरी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील “एक दिवस तरी वारी अनुभवावी” हा उपक्रम मोठ्या उत्साहात पूर्ण झाला. खरं तर अंतर जास्त असल्याने चालायला थोडं जड गेलं. पण एकदा पिठलं भाकर, हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि वांग्याच्या भाजीवर ताव मारल्यानंतर पुन्हा सगळे फ्रेश झाले. सचिन माळी, शीतल साठेचा अभंग, सुनील स्वामीची रचना गाऊन सादर झाल्याने वातावरण निर्मिती झाली. शरद कदम, सुभाष वारे सर, अविनाश पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर, सुबोधदादा, दत्ता पाखिरे, वर्षा देशपांडे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. समरोपाला मी १० चं मिनिटांत माझं म्हणणं पूर्ण करतो असं सांगून मी बोलायला सुरुवात केली आणि अर्धा तास कसा गेला ऐकणारांसह मलाही कळले नाही. चहानंतर फोटो सेशन आणि त्या अर्ध्या तासाच्या मांडणीचं प्रत्येकाकडून कौतूक ऐकत “एक दिवस तरी वारी अनुभवावी” हा उपक्रम पूर्ण झाला आणि संविधान समता दिंडीचा प्रवास सुरू झाला….

Savindhan Samta Dindhi

२७ जून २०२२

Savindhan Samta Dindhi

संविधान समता दिंडी तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात “वरवंड” वरून सहभागी झाली. सोबतीला नागेश जाधव, राजवैभव, कविता आणि अनिसचे औरंगाबादचे भाऊ पठारे होते. संविधान रथ रोटी घाट पार करून पठारावर आल्यानंतर प्रत्यक्ष दिंडीत चालायला सुरुवात केली. पण लगेच रिमझीम पाऊस सुरू झाला. मी आणि भाऊ पठारे यांनी संविधान रथाचा आधार घेतला. पण नागेश, राजवैभव आणि कविता हे तरुण मात्र उत्साहात पुढे चालत राहिले. भाऊ पठारे आणि मी ज्या दिंडीत संविधान रथ असणार होता त्या सोमनाथ महाराज पाटील यांच्या दिंडी चा विसावा (दुपारी जेवणाचे ठिकाण) शोधून काढला. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. बासुंदी, कांदा भजी सह इतर साग्रसंगीत भोजन तयार होत होते. जेवणाची वेळ झाली आणि जोराचा पाऊस आला. तो काही थांबेना….. एवढ्यात पाटील महाराज यांची दिंडी रोटी घाट चढून आली. पाऊस जरा कमी होताच वारक-यांनी ओल्या कपड्यातच जिथे जागा मिळेल तिथे जमेल तसे जेवण उरकले. सोमनाथ महाराज, मी आणि भाऊ पठारे यांनी जेवण बनविण्यासाठी तयार केलेल्या आडोशाला जेवण उरकले. बेत भारी असला तरी पावसाने त्याचा आनंद मिळू दिला नाही. पाऊस जरा थांबला. तेव्हा पठारावर फेरफटका मारला. सर्व दिंड्या जेवणासाठी थांबलेल्या होत्या. अनेक वारक-यांच्या भेटी झाल्या. दुपारचे विसावा पूर्ण करून “गवळ्याची उंडवळी”च्या दिशेने निघाल्या. पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाल्याने आम्ही संविधान समता रथाचा आधार घेतला. गवळ्याची उंडवळी जवळ नागेश, राजवैभव आणि कविता भेटले. रस्त्यात राजवैभवने तीन ठिकाणी संविधानाचे भारुड केले.

दरम्यान मी बारामती येथील डाॅ. सूवर्णसंध्या धुमाळ यांच्याशी संपर्क साधून एखाद्या संविधान प्रवचनाचे नियोजन होईल का? याचा अंदाज घेतला. डाॅ. सूवर्णसंध्या धुमाळ या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळशी जोडलेल्या आहेत. नेमक्या याच काळात त्या पुण्यात रहायला गेल्या आहेत. पण त्यांनी दिनेश आदलिंग यांच्याशी जोडून दिले. दिनेश हे एक अत्यंत उत्साही सामाजिक कार्यकर्ते आहेत. बारामती येथे त्यांची युवकांना मोटीवेट करणारी संस्था आहे. ते स्वतः कवी आहेत. त्यांनी आपल्या संस्थेत काही सामाजिक कार्यकर्त्यांसाठी संविधान कीर्तनाचे आयोजन केले. शक्य असल्यास रात्रीच मुक्कामाला यावे अशी विनंती केली. नागेश, कविता यांनाही मुंबईकडे जायचे होते. गवळ्याची उंडवळी येथे मुक्कामाची सोयही नव्हती. मग सर्वानुमते बारामतीला जाण्याचा निर्णय घेतला.

संध्याकाळी ६.०० च्या सुमारास बारामतीला पोहचलो. नागेश, कविता मुंबईकडे निघाले. राजवैभव त्यांच्या मित्रासोबत गेले तर मी आणि भाऊ पठारे दिनेश आदलिंग यांच्या घरी मुक्कामाला गेलो. त्यांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले. त्यांच्या प्रत्येक शब्दांतून, देहबोलीतून जिव्हाळा पाझरत होता. रात्री पुरणपोळीचे जेवण आणि त्यानंतर कवितेची मैफिल. खूप मजा आली.

२८ जून २०२२

Savindhan Samta Dindhi

अदलिंग यांच्या संस्थेत निवडकं लोकांसाठी संविधान प्रवचन झाले. सर्वांना खूप आवडलं. संध्याकाळी सुप्रियाताई साठे यांच्या महिला दिंडीसमोर बारामती मार्केट यार्ड येथे संविधान प्रवचन झाले. लोक चालून आले होते. तरीही निवडक लोकांनी संविधान प्रवचन काळजीपूर्वक ऐकले. आज मालवणहून आलेले नितीन वाळके संविधान दिंडीत सहभागी झाले होते.

२९ जून २०२२

Savindhan Samta Dindhi

सकाळी दिंडी सोबत प्रवास सुरू झाला. सोबत नितीन वाळके, भाऊ पठारे होते. बार्टीचे अधिकारी नांदेडकर यांचा फोन आला. महाराज बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभीये आणि वरिष्ठ अधिकारी येणार आहेत. त्यांना एखाद्या दिंडीत चालण्याची व्यवस्था करता येईल का? लगेच सूत्र हलविली. बार्टीचा संविधान रथ काटेवाडीला पोहचला होता. तिथपर्यंत पोहचलो. अधिकारी कधी येणार आहेत, याचा अंदाज घेतला. केज तालुक्यातील महादेव महाराज बो-हाडे यांच्या दिंडीशी बोलणे केले. साधारण ११.३० च्या सुमारास धम्मज्योती गजभीये आणि वरिष्ठ अधिकारी बार्टीच्या संविधान दिंडी जवळ पोहचले. स्वागत सभारंभ झाल्यानंतर शामसुंदर महाराज यांनी दणक्यात संविधान प्रवचन केले. गजभीये आणि वरिष्ठ अधिकारी प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होते.

त्यानंतर या सर्व वरिष्ठ अधिका-यांची चालण्याची व्यवस्था बो-हाडे महाराज यांच्या दिंडीत करण्यात आली. सर्वांनी टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर ताल धरला. निबंधक इंदिरा मॅडम, वरिष्ठ अधिकारी मोहिते मॅडम यांनी तुळस टोक्यावर घेतली. पुढे फुगड्याही खेळल्या. मग गजभीये यांच्यासह सर्व अधिका-यांनी आपल्या संविधान दिंडीला भेट दिली. त्यानंतर सर्व अधिकारी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीकडे रवाना झाले. या सर्व सोहळ्याचे चित्रीकरण नितीन वाळके मनलावून केले.
एवढा वेळ आम्ही ब्रेकफास्ट घेतलेला नव्हता….. दिंड्यांत जल्लोष सुरू होता तोवर भुकेची जाणीव झाली नाही. पण जसे अधिकारी निघून गेले तशी भूक लागली. रस्त्या लगतच महादेव महाराज बोराडे यांचे ट्रक आणि टेम्पो दिसले. महाराज यांच्याशी स्नेह असल्याने त्यांची भेट घेतली. जेवणं सुरू होती. महाराजांनी जेवणाचा आग्रह केला. आम्ही जराही आनमान न करता जेवणाला होकार दिला. जेवायला बसायच्या वेळी लक्षात आले की भाऊ पठारे दिसत नाही. सकाळपासून ते फार दिसले नव्हते. मग वाळके यांच्याकडे चौकशी केली तेव्हा कळले की पठारे यांची प्रकृती ठीक नाही. ते संविधान रथात झोपलेत. त्यांना जाऊन उठवले. जेवायला नकार देत असताना आग्रह करून जेवायला बसवले. पुन्हा ते जाऊन संविधान रथात झोपले. मग मात्र दर तासाला त्यांची चौकशी केली. दिंड्या भवानी नगरला पोहचल्या तेव्हा पठारे यांना दवाखान्यात नेले. पण गर्दी पाहून त्यांनी मेडिकल स्टोअर्सवरूनच काही गोळ्या घेतल्या. पठारे यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. पण रात्र झाल्यामुळे ते म्हणाले सकाळपर्यंत पाहतो. बरे वाटले तर थांबतो नाही तर जातो. मग आम्ही तिघेही संविधान रथात झोपलो. साधारण रात्री २.०० वाजता माझ्या पोटात गडबड वाटू लागली. मी टेम्पोतून खाली उतरून टाॅयलेटला जाऊन आलो. १५-२० मिनिटांच्या अंतराने चार वेळा जावे लागले. टेम्पोतून चढणे उरणे नको म्हणून खालीच बसून राहिलो. सकाळी ५.०० वाजेपर्यंत आणखी दोन वेळा जावे लागले. आता मलाही अशक्तपणा जाणवू लागला.

३० जून २०२२

Savindhan Samta Dindhi

सकाळीही पठारे यांची प्रकृती ठीक झाली नाही. माझ्याही पोटात गडबड होती. मग पठारे यांना घरी पाठविण्याचे ठरले. दिंड्यांमुळे वाहतूक पब्लिक वाहनासाठी बंद होती. मग पूढच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत संविधान रथातून पठारे यांना घेऊन गेलो. तिथून नितीन वाळके यांना रथा सोबत ठेवले आणि मी इंदापूरपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. “निमगाव केतकी”वरून पठारे यांच्यासोबत इंदापूर येथे आलो. मी दिंडीत सहभागी होण्यापूर्वी थेट नागपूर येथून एका शिबिरातून आलो होतो. त्यामुळे पुरेसे कपडे नव्हते. प्रकृतीही फारशी ठीक नाही. कपडेही घरी जाऊन आणावेत, असा विचार आला. तशी कल्पना ड्रायव्हर आणि वाळके यांना देऊन मीही गावाकडे गेलो. डिसेंट्रीच्या भितीने खाणे टाळले. नारळ पाण्यावर घर गाठले.

१ जुलै २०२२

Savindhan Samta Dindhi

प्रकृती फार बरी नव्हती पण संविधान दिंडी सोडून आल्याची सलोखा कमी होईना. वाळके एकटेच दिंडीत आहेत. घरातून दिंडीत यायला परवानगी मिळेना. त्यात एक दिवस गेला. रात्री मात्र आवश्यक कपड्यांची बॅग भरली.

२ जुलै २०२२

Savindhan Samta Dindhi

सकाळी ७.०० वाजता घर सोडले. २ आणि ३ चा मुक्काम इंदापूर येथे होता. इंदापूर येथे प्रा. कृष्णा ताटे यांच्याकडे सुभाष वारे सर यांनी बोलून प्रवचन ठरले होते. टेम्पोत मुक्काम करावा अशी परिस्थिती नव्हती. ताटे सर यांच्या घरी गेल्या वेळीही प्रवचन केले होते. त्यामुळे जवळीक होती. त्यांच्या घरी २०० वारकरी मुक्कामाला असतात. मला राहता येईल का? असे ताटे सर यांना विचारले. ताटे सर म्हणाले, असे काय विचारता? एवढे वारकरी राहतात तुम्हाला काय अडचण आहे. ४.०० वाजता इंदापुरात पोहचलो. ज्या सोमनाथ महाराज पाटील यांच्या दिंडीत चालतो तिथून पाच किलोमीटर अंतरावर बसने सोडले. प्रकृतीची तक्रार. कपड्यांचे ओझे. उन्हाची काहिली. काय करावे काही कळेना. मोटारसायकल सोडत होते. मात्र इतर वाहनांना बंदी होती. प्रत्येक मोटार सायकलला हात करीत होतो. साधारण अर्ध्या तासाने एका मोटारसायकल स्वाराने लिफ्ट दिली. सोमनाथ महाराज पाटील यांच्या दिंडीजवळ पोहचलो.

इंदापुरात मोहन अण्णा लवांडे यांच्या दिंडीवर प्रवचन करायचे अगोदरच ठरवले होते. तसे ताटे सर यांना कळविले. लवांडे अण्णाकडे प्रवचनासाठी गेलो. अण्णा आणि त्यांच्या सहका-यांनी माईक सिस्टीम वगैरे जय्यत तयारी केली होती. मग तासभर प्रवचन केले. गेल्या वेळीही इथेच त्यांच्या दिंडीवर प्रवचन केले. सर्व खुश झाले. आजून ऐकायची इच्छा आहे, असे सर्वजण म्हणाले. मग काय लवांडे अण्णा यांनी ९ जुलै २०२२ ला पंढपुरात कीर्तन फिक्स केले. प्रवचन संपताच ताटे सर यांना फोन केला. ते घ्यायला आले. प्रकृती बरी नाही हे लक्षात येताच त्यांनी स्वतंत्र खोलीत राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या घरात चार डाॅक्टर आहेत. मुलगा, मुलगी, दोन पुतणे. डाॅक्टर अभिजित यांनी उपचार सुरू केले. उपचार आणि रात्रीचा चांगला आराम. बरे वाटू लागले.

३ जुलै २०२२

Savindhan Samta Dindhi

तुकोबारायांच्या पालखीचे इंदापूर येथे दोन मुक्काम असतात. संध्याकाळचे प्रवचन ताटे यांच्याकडे होणार होते. पण दुपारी आणखी एखाद्या ठिकाणी संविधान प्रवचन करावे, असे वाटत होते. ताटे सर यांनी सल्ला दिला आज दगदग न करता आराम करा. संध्याकाळी आपलं एक प्रवचन करा. डाॅक्टर आभिजित ताटे यांनी सकाळी पुन्हा तपासून काही गोळ्या दिल्या. औषधे घेऊन आराम केला. ताटे सर यांच्या वहिनी, मुलगी, पुतणे यांनी खूप काळजी घेतली.
संध्याकाळी फ्रेश वाटू लागले. ताटे सर यांच्या घराजवळच्या महादेव मंदिरात प्रवचन केले. रात्री भोजन,उपचार आणि आराम. सकाळी एकदम ओके वाटले.

४ जुलै २०२२

Savindhan Samta Dindhi

ताटे सर यांच्या कुटुंबियांनी काळजी घेतल्याने ठणठणीत वाटू लागले. सकाळी सरळ दिंडीत प्रवास सुरू केला. नियोजित मुक्काम “रसाटी”ला असला तरी तेथे जागा नसल्यामुळे सोमनाथ महाराज पाटील यांची दिंडी थेट अकलूजला जाते. रात्री मुक्काम अकलूजला झाला. दुस-या दिवशीचा मुक्कामी अकलूज येथेच होता. दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्लॅनिंग केले.

५ जुलै २०२२

पहिला कार्यक्रम अभिजित हाॅस्पिटल येथे भारत विठ्ठलदास यांच्या वैज्ञानिक चमत्काराचा ठेवला. भारत यांनी
चमत्कार आणि त्यामागील विज्ञान प्रयोगांतून सादर केले. मी त्यानंतर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51 प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोन कसा बाळगला पाहिजे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. हसत खेळत केलेले प्रयोग आणि संविधान मूल्यांची घातलेली सांगड श्रोत्यांना चांगलीच भावली.

दुपारी ३.०० ते ५.०० अकलूज येथील राम मंदिर परिसरात उतरलेल्या तीन दिंड्यांच्या मध्यभागी माझे संविधानाचे प्रवचन. त्यानंतर भारत विठ्ठलदास यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे चमत्काराचे प्रयोग झाले. दिंडी चालक चौधरी यांनी गावच्या कीर्तनाचे निमंत्रण दिले. संध्याकाळी ७.०० वाजता विवेकी कीर्तनकार डाॅ. सुहास महाराज फडतरे यांच्या दिंडीभध्ये संविधान प्रवचन झाले.

६ जुलै २०२२

अकलूजवरून दिंड्या सकाळी निघाल्या. पुढचा मुक्काम “बोरगाव “हे अंतर कमी असले तरी रस्ता लहान होता त्यामुळे खूप वाहतूक कोंडी झाली. आम्ही मधल्याच एका रस्त्याने दुपारचे विसावा असलेल्या “म्हाळुंगे” येथे पोहचलो. तेथे आरपीआय पक्ष आणि म्हाळुंगे नगरपंचायतीच्या वतीने संविधान दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यासाठी नगराध्यक्ष अशोक चव्हाण आणि आरपीआय कार्यकर्ते सुधीर भोसले यांनी जय्यत तयारी केली होती. येथे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे चमत्काराचे प्रयोग, शाहीर बापू जाधव यांच्या आवाजातील समतेची गाणी, गाडगेबाबा यांच्या वेशातील फुलचंद चंद्रटिळक यांचे प्रबोधन आणि शामसुंदर महाराज सोन्नर यांचे संत साहित्य आणि संविधानावरील व्याख्यान असा जंगी कार्यक्रम झाला. हजारो श्रोत्यांनी हा कार्यक्रम ऐकला. पुढच्या वेळी आणखी नेटके नियोजन करण्याचे वचन नगराध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले.

पंढरीच्या वाटेवर संविधानाचा विचार रुजविण्यासाठी निघालेली दिंडी संध्याकाळी “श्रीपूर” गावात पोहचेल तेव्हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करावे, अशी संकल्पना समतादूत मुकुंद लोंढे यांनी मांडली. आम्हाला ती आवडली. म्हाळुंगे येथील कार्यक्रम संपवून श्रीपूरकडे निघण्यापुर्वी याची कल्पना काही आरपीआयच्या कार्यकर्त्यांना लोंढे यांनी दिली. कार्यकर्त्यांनाही संकल्पना आवडली. दिंड्यांच्या स्वागताला शहरातील प्रमुख लोक प्रवेशद्वारावरच होते. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांना या उपक्रमाची माहिती दिली. आम्ही श्रीपूरमध्ये पोचेपर्यंत प्रमुख मंडळी आंबेडकर पुतळ्यासमोर जमली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत असताना मी संविधानावर सुंदर प्रवचन करतो, असे लोंढे यांनी जमलेल्या मान्यवरांना सांगितले. तेव्हा श्रीपूरचे उपनगराध्यक्ष पाटील नाना, आरपीआयचे शहराध्यक्ष भारत आठवले यांनी संविधान आणि संत साहित्यावर बोलण्याचा आग्रह केला. कोणताही आनमान न करता लगेच बोलायला सुरुवात केली. कोणतीही पूर्वतयारी नाही. माईक सिस्टीम नाही. खड्या आवाज बोलायला सुरुवात केली आणि काही वेळात मोठा समुह जमला. अगदी मोजक्या वेळेत पण महत्वाचे मुद्दे यावेळी मांडता आले. आजच्या दिवसातील दुसरा कार्यक्रम असा अचानक पण उत्तम त-हेने पार पडला.

ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर


Tags: Savidhan Samta Dindiसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गसंविधान समता दिंडी
Previous Post

गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी २१४ गणपती स्पेशल रेल्वे गाड्या!

Next Post

भाजपा आणि शिंदे गटात कशी होणार सत्तेची वाटणी? साटम, सागरांसारख्या नव्या चेहऱ्यांना संधी!

Next Post
devendra fadnavis Ameet Satam yogesh Sagar Eknath Shinde

भाजपा आणि शिंदे गटात कशी होणार सत्तेची वाटणी? साटम, सागरांसारख्या नव्या चेहऱ्यांना संधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!