Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गजाआडच्या बुवा-बाबांनाही ग्रासतोय कोरोना! आसारामनंतर आता राम रहिम! कोरोनाची शक्यता

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ram rahim

मुक्तपीठ टीम

बलात्कार आणि हत्या यासारख्या गंभीर गुन्हांमध्ये दोषी आढळल्यानंतर रोहतक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख, गुरमीत राम रहिम याची बुधवारी संध्याकाळी अचानक तब्येत बिघडली. यामुळे त्याला कडक सुरक्षितेसह रोहतक पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरमीतमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला इथल्या व्हीआयपी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहेत. मात्र, याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. याआधीच आसाराम बापूलाही कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात हलवावे लागले आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहिमची प्रकृती खालावल्याने तुरुंगातील रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पीजीआयच्या पथकाला तुरूंगात पाठविण्यात आले. नंतर त्याला रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. राम रहिमला पीजीआयमध्ये हलण्यापूर्वी त्याच्या अवतीभोवती सुरक्षेचा वेढा घालण्यात आला.

 

डीएसपी शमशेरसिंग दहिया यांच्या संरक्षणाखाली पोलिसांनी त्यांना सायंकाळी ६:१० वाजता तुरूंगातून रुग्णालयात आणले. एमएस कार्यालयाबाहेर थेट रुग्णवाहिका थांबवण्यात आली. राम रहिमला सुरक्षेसह विशेष वॉर्डात ठेवण्यात आले आहे.

राम रहिमवर बलात्काराचे आरोप

  • गुरमीत राम रहिम साध्वी बलात्कार आणि हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर रोहतक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
  • दोषी ठरल्यापासून गुरमीत राम रहिम २७ ऑगस्ट २०१७ पासून तुरूंगात आहे.
  • साध्वी बलात्कार प्रकरणात गुरमीत राम रहिमला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बलात्काराची शिक्षा झालेला आसारामही कोरोनाग्रस्त

  • आसारामला २०१८मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
  • आसारामने तिच्यावर १५ ऑगस्ट २०१३च्या रात्री बलात्कार केला होता.
  • बलात्कार प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आसारामचीही प्रकृती खालावली आहे.
  • रुग्णालयात हलवल्यानंतर त्याने आता हरिद्वारला जाऊन आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी दोन महिन्याचा जामिन मागितला आहे.

Tags: asaram bapucoronaram rahimआसाराम बापूगुरमीत राम रहिमडेरा सच्चा सौदारोहतक पीजीआय
Previous Post

अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्यासाठी आता ‘हे’ वेगळे मार्ग

Next Post

डीआरडीओच्या कोरोना रामबाण औषधाचा दिल्लीत सर्वप्रथम वापर

Next Post
drdo

डीआरडीओच्या कोरोना रामबाण औषधाचा दिल्लीत सर्वप्रथम वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!