Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याची गरज; कामांना गती द्यावी”

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 22, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Gulabrao Patil

मुक्तपीठ टीम

जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे याकामी नियुक्त करण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांकडून कामे गतिमान होतील, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांच्या (पीएमसी) कामकाजासंदर्भात मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ह्रषिकेश यशोद, मुख्य अभियंता सर्वश्री राजेश निघोट, रहाणे, लोलापवार, संचालक (वित्त) मडके, अधीक्षक अभियंता पी. आर. नंदननवरे व प्रशांत भामरे यांच्यासह प्रकल्प व्यवस्थापन संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे कमीत कमी ५५ लीटर प्रति माणसी प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे या मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे या योजनेतून जी कामे राज्याच्या विविध विभागात सुरु आहेत, ती वेळेवर पूर्ण होणे महत्वाचे आहे. त्यामुळे प्रकल्प व्यवस्थापन संस्थांनी संबंधित गावांचा सर्व्हे करुन प्रकल्प अहवाल वेळेत देणे आवश्यक आहे. या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा होता कामा नये, असे पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

 

राज्यात पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोकण, नागपूर, या सहा विभागातील एकूण ४५६ योजनांपैकी १९८ योजनांसाठी प्रकल्प व्यवस्थापन संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने या संस्थांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही ही कामे संस्था वेळेवर पूर्ण करतील, यासाठी नियमितपणे पाठपुरावा करणे आणि आढावा घेणे आवश्यक असल्याचे मंत्री पाटील यांनी नमूद केले.

 

औरंगाबाद विभागात १८, पुणे विभागात ५०, नाशिक विभागात ८०, अमरावती विभागात ३४, कोकण विभागात १६ अशा १९८ योजनांसाठी प्रकल्प व्यवस्थापन संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांनी प्रकल्प अहवाल तयार करुन तातडीने तो विभागाकडे सादर करण्याच्या सूचना पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी दिल्या.

 


Tags: Gulabrao PatilMaharashtraगुलाबराव पाटीलजल जीवन मिशन
Previous Post

नेट-सेट संघर्ष समितीकडून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार

Next Post

“वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचे १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलन, ‘जेलभरो’ही करणार!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचे १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलन, ‘जेलभरो’ही करणार!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!