Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तिलारी प्रकल्प मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा – गुलाबराव पाटील

June 16, 2022
in सरकारी बातम्या
0
Min Gulabrao Patil Sir meeting 1

मुक्तपीठ टीम

तिलारी प्रकल्पावर आधारित १८ गावे, वेंगुर्ला शहर व मार्गस्थ औद्योगिक क्षेत्र आणि पर्यटनस्थळांसाठी पाणी पुरवठा योजनेचे काम येत्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा तसेच तिलारी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १५ जुलै २०२२ पर्यंत मंजुरी घ्यावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात तिलारी प्रकल्पावर आधारित प्रकल्पाविषयी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दिपक केसरकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्यासह रा. पा. निघोट, सी. आर. गजभिये, प्रशांत भामरे, नितीन उपरोल, डी. एच. अरगडे, यु. एच. महाजन आदीं अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, मंजूर योजनेनुसार तिलारी धरणापासून २५ किलोमीटर अंतरावर  सासोली येथे तिलारी नदीच्या उजव्या तीरावर जॅकवेल व पंपगृह बांधण्यात येत असून त्यास लागून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात येत आहे. जॅकवेल मधून पाणी व्हर्टिकल टर्बाईन पंपाद्वारे उपसून  डेगवे येथील दाबमोड टाकीत घेऊन व तेथून लाभधारक कंपनी  उत्तम स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेड (SUSPL) सातार्डे यांना लागणारे शुद्धीकरण विरहित पाणी थेट पाइपलाइनद्वारे पुरविण्यात येणार होते. उर्वरित पाणी डेगवे येथेच प्रस्तावित जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द करुन पाईप लाईनव्दारे वेंगुर्ले पर्यंत नेले जाणार असून मार्गस्थ लाभधारक गावांना, पर्यटन व आद्यौगिक क्षेत्रात तसेच वेंगुर्ला शहरास पाणी पुरविण्यात येणार आहे.

तिलारी प्रकल्पाची योजना राबविण्यासाठी सहभागी ठेकेदार मे.  उत्तम स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेड (SUSPL) यांच्याबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सामंजस्य करार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

गुलाबराव पाटील म्हणाले, योजनेंतर्गत प्रस्तावित उपांगांच्या जमिनी ताब्यात घेण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. योजनेसाठी आवश्यक इतर खात्यांकडून उदा. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूसंपादन शाखा (जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग) परवानग्या प्राप्त करण्यासाठी सर्व कार्यवाही पूर्ण केली आहे.  योजनेंतर्गत प्रस्तावित गुरुत्ववाहिन्यांकरीता ७७.२३ कि.मी. इतक्या सर्व लांबीच्या डी. आय. पाईप्सचा पुरवठा करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


Tags: Gulabrao PatilMaharashtraTilari Projectगुलाबराव पाटीलतिलारी प्रकल्प
Previous Post

अरे व्वा वसंत मोरे! एसटी चालक-वाहकांच्या माणुसकीवर एकाकी महिलेला घरी पोहचवून चढवला कळस!

Next Post

आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या- अनिल परब

Next Post
Special Bus for Ashadi ekadashi

आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या- अनिल परब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!