Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्प त्वरित पूर्ण करावा- गुलाबराव पाटील

April 7, 2022
in सरकारी बातम्या
0
Min Gulabrao Patil Meeting

मुक्तपीठ टीम

औरंगाबाद शहरासाठीच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम गतीने करून हा प्रकल्प त्वरित पूर्ण करावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्पासंदर्भात उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार संजय शिरसाट, प्रधान सचिव संजीव जयस्वाल,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय तसेच संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील जुन्या पाणी पुरवठा योजनेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1680 कोटींची योजना मंजूर आहे. औरंगाबाद शहरासाठी हा पाणीपुरवठा प्रकल्प महत्वपूर्ण असून सर्व संबंधीत यंत्रणांनी या प्रकल्पाचे काम गतीने करून प्रकल्प त्वरित पूर्ण करावा. योजनेच्या कामाला सुरुवात झाली असली तरी पाइपलाईनचे काम गतीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. संबंधित यंत्रणांनी औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यकता असल्यास आपल्या स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे व उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून ते सुव्यवस्थितपणे वितरीत करावे. संबंधित ठेकेदारांनी प्रकल्पाचे काम कालबद्ध रीतीने  पूर्ण करावे. अन्यथा कडक कारवाई करण्याचे निर्देशही पाणीपुरवठा मंत्री श्री पाटील यांनी दिले.

उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, औरंगाबाद शहरात नागरी सुविधांची अनेक दर्जेदार कामे झाली आहेत. शहरासाठी आवश्यक असणाऱ्या या पाणीपुरवठा प्रकल्पाचे कामही वेगाने पूर्ण करून शहरवासीयांना दिलासा देण्यात यावा. शहरातील पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा विभागात काम केलेल्या निवृत्त तज्ज्ञ अधिका-यांचेही सहकार्य घेण्यात यावे. औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य घेण्यात यावे असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.


Tags: Gulabrao PatilIndustry Minister Subhash Desaiऔरंगाबादमंत्री गुलाबराव पाटीलसुभाष देसाई
Previous Post

“…तर राज ठाकरे टेबलवर उभे राहून सभा घेतील!”

Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बीड मॉडेलच्या समावेशाची कृषी मंत्री दादाजी भुसेंची मागणी

Next Post
मा मंत्री दादाजी भुसे पत्रकार परिषद 1

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बीड मॉडेलच्या समावेशाची कृषी मंत्री दादाजी भुसेंची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!